Facebook, Instagram, WhatsApp Down : फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सॲपचा (WhatsApp) डाऊन असल्याने युजर्सना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. डाऊनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मेटा (Meta) कंपनीच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यात अडचणी येत आहेत. युजर्स ट्विटरवर ट्विट करत आपला राग व्यक्त करत आहेत. ट्विटरवर #Facebook , #Instagram , #WhatsApp , #FacebookDown असे हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहेत.


अद्याप या समस्येचं कारण अस्पष्ट आहे. ही समस्या हे मेटाच्या सर्व्हरशी किंवा ॲपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यासाठी लोक वापरत असलेल्या डिव्हाईसशी संबंधित असू शकते. आयफोन युजर्सला मेटा कंपनीच्या मालकीचे सोशल मीडिया ॲप वापरण्यात अडचण येत आहे. आयफोन युजर्सला मेटाच्या मालकीचे ॲप वापरताना सेवा तात्पुरती अनुपलब्ध (Service Temporary Unavailable) असल्याचा संदेश मिळत आहे.


युजर्स ट्विटरवर संताप व्यक्त करत
युजर्स आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटरसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. एका व्यक्तीने ट्विटरवर विचारले की, इतर कोणालाही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यात अडचण येत आहे का? यावर दुसऱ्या युजरने ट्विट करत फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ऑल डाउन असल्याचं सांगितलं.


इंस्टाग्राम 19 एप्रिललाही डाऊन झाले होते
यापूर्वी 19 एप्रिल रोजी इंस्टाग्राम जागतिक स्तरावर डाउन झालं होतं. त्यावेळी बहुतेक युजर्सना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाण्यात अडथळे येत होते किंवा फीड रिफ्रेश करता येत नव्हतं. त्यावेळीही यूजर्सने आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटरची मदत घेतली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या