Elon Musk on Twitter Deal : टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची ट्विटर (Twitter) डील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एलॉन मस्क यांनी सध्या ट्विटरसोबतचा करार पूर्ण होऊ शकत नाही अशी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. यामुळे एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील डील तुर्तास थांबवण्यात आली आहे.


एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरकडे स्पॅम आणि फेक अकाऊंट्सची एकूण संख्या किती आहे. याबाबत विचारणा केली होती. एलॉन मस्क यांना ट्विटरवर किती 'फेक' (Fake Account) या 'स्‍पॅम' (Spam Account) किंना 'बॉट्स' अकाउंट (Boots Account) आहेत, याबाबत संपूर्ण माहिती हवी आहे. जोपर्यंत ट्विटरकडून याबाबत योग्य ती माहिती मिळत नाही, तोपर्यंत हा करार पूर्ण होऊ शकत नाही असं मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे.






'...तोपर्यंत डील होऊ शकत नाही'


एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम अकाऊंटचा ट्विटरने 20 टक्के असल्याचं सांगितलं आहे. पण आकडा ट्विटरने केलेल्या दाव्यापेक्षा चार पटीनं अधिक असू शकतो. माझी ट्विटरसाठीची ऑफर ट्विटरच्या अचूक माहितीवर आधारित होती. काल ट्विटरच्या सीईओंनी सार्वजनिकपणे पाच टक्के बनावट अकाऊंट्सचा पुरावा दाखवण्यास नकार दिला. आता संपूर्ण माहिती मिळेपर्यंत हा करार पुढे जाऊ शकत नाही.' 


महत्त्वाच्या इतर बातम्या