Share Market : शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) ची मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 60 हजारांखाली गेला आहे तर, निफ्टीदेखील 49 अंकांनी खाली घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. सततच्या कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या वाढीचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. परिणामी शेअर बाजारात चिंतेचं वातावरण आहे. जगभरातील शेअर बाजारात सर्वत्र अनेक बाजारपेठा कोसळल्या आहेत.


सेन्सेक्स 60,000 उघडल्यानंतर आता 59,820 वर आहे. बाजार उघडताच सुरुवातीलाच सेन्सेक्स 300 अंकांनी 0.50 टक्के घसरला होता. निफ्टी 70 अंकांनी 0.40% घसरून 17,870 वर होता. आयटी आणि बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घट पाहायला मिळाली. पॉवर ग्रिड 2.22 टक्क्यांवर होते, त्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि टाटा स्टील यांचा क्रमांक लागतो. एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांच्यासह सेन्सेक्समध्ये टॉप शेअर्स इन्फोसिस 1.8% खाली आला.


आयपीओला (IPO) ला विक्रीच्या सुरुवातीच्या दिवशी गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. NII ने IPO 1.02 पट सबस्क्राईब केले. QIB भाग कोणतीही बोली जमा करण्यात अयशस्वी झाला. गुंतवणूकदारांनी 2.52 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आणि 2.86 कोटी शेअर्स ऑफर केले. ग्रे मार्केटमध्ये, AGS Transact Technologies चे शेअर्स 166 ते 175 प्रति शेअर या किमतीच्या तुलनेत 15 रुपये प्रीमियमने ट्रेड करत होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha