Salary Account : आपण नोकरी करणारे व्यक्ती आहात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.  नोकरी करणाऱ्या लोकांचं सॅलरी अकाऊंट असतं. आपला पगार ज्या खात्यात जमा होतो, ते अकाऊंट म्हणजे सॅलरी अकाऊंट. अनेकदा तुम्ही ज्या संस्थेत काम करता, ती संस्थाच सॅलरी अकाऊंट सुरु करुन देते.  सॅलरी अकाऊंटशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीही तुम्हाला माहिती असायला हव्यात. बँकेच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, प्रीमियम सॅलरी अकाऊंट, रेग्युलर सॅलरी अकाऊंट, डिफेन्स सॅलरी अकाऊंट असे प्रकार आहेत. 


जाणून घेऊया सॅलरी अकाऊंटबद्दल आणखी महत्त्वपूर्ण माहिती:  


झिरो बॅलन्स अकाऊंट : या अकाऊंटचं वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला किमान रक्कमची मर्यादा नसते. म्हणजे तुमच्या अकाऊंटमध्ये एकही रुपया नसेल, तरीही अकाऊंट सुरु राहतं. या अकाऊंट प्रकारात क्रेडिट कार्ड, डेबिट यांसारख्या सुविधाही सुलभतेने मिळतात. शिवाय, ओव्हरड्राफ्ट, डिमॅट अकाऊंट इत्यादीही सेवा मिळू शकतात. या खात्यातील रकमेवर कोणत्याही प्रकारचा व्याज आकारला जात नाही. त्याचवेळी बचत खात्यातील रकमेवर 4 ते 6 टक्के व्याज द्यावा लागतो, जे प्रत्येक बँकेवर आधिरत असतं.  


 क्रेडिट आवश्यक : जर तुमचा पगार 3 महिन्यांपर्यंत क्रेडीट होत नाही, तर बँकेकडून सॅलरी अकाऊंटला सेव्हिंग अकाऊंट समजलं जातं. मग अशावेळी तुम्हाला सॅलरी अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स न ठेवता, किमान रक्कम ठेवावी लागते. मात्र, आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, आता कमी रक्कम असली तरीही बँका कोणत्याही प्रकारचे शुल्क खातेदाराकडून आकारणार नाहीत.   


परतफेड खाते : ज्यांचं पहिल्यापासून सॅलरी अकाऊंट आहे, अशाच कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना या खात्याबाबत विचारणा केली जाते. विशेष म्हणजे कर्मचारी सॅलरीसह इतर कामंही या खात्याच्या माध्यमातून करु शकतात.


संबंधित बातम्या


Weight Loss : रोज सकाळी प्या Garlic Water; झटपट कमी होईल वजन


Health Tips : शुद्ध तुपाचा आहारात समावेश केल्याने होतील 'हे' फायदे 


Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? जाणून घ्या ग्रीन टी पिण्याचे फायदे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha