इंग्लंड : वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखत ब्रिटननं आतापासूनच ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
2040पासून पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड कारच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटननं घेतला आहे. एक महिन्यापूर्वीच फ्रान्सही 2040पासून पेट्रोल आणि डिझेल कारच्या बंदीचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर सर्वाधिक वायू प्रदूषण करणाऱ्या छोट्या कार आणि व्हॅन ब्रिटनमध्ये बंद होणार आहेत.
ब्रिटन आणि फ्रान्स आता नॉर्वेच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नॉर्वेमध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री होते. नॉर्वेत 2025पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिक आणि प्लग इन हायब्रिड गाड्यांची विक्री करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, 2040नंतर ब्रिटनमध्ये फक्त इलेक्ट्रिक कारचीच विक्री होणार आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com