मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं एक नवा डेटा टेरिफ प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज तब्बल 3जीबी 4जी डेटा मिळणार आहे.

एअरटेलनं आपला हा खास प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. यासोबतच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगही ग्राहकांना मिळणार आहे.

या प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. जिओच्या 'धन धना धन' ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं हा नवा प्लॅन आणला आहे. रिलायन्स जिओ 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी 4G डेटा देतं. ज्याची वैधता 56 दिवसासांठी असते.

दोन्ही कंपन्या आपल्या यूजर्सला जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनची वैधता मात्र वेगवेगळी आहे.

रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर सर्वच टेलीकॉम कंपन्यांनी स्वस्त आणि जास्त डेटा देणारे प्लॅन आणले आहे. त्यामुळे सध्या जिओ आणि इतर कंपन्या बरेच नवनवे प्लॅन लाँच करत आहे.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)