Twitter New Features: मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर (Twitter)वर कोट्यवधी यूजर्स आहेत. ट्विटरला यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता काही नवीन फीचर्स येणार आहेत. नुकतेच ट्विटरला नवीन सीईओ मिळाले आहेत. आता या प्लॅटफॉर्मवर दोन नवीन फीचर्स अॅड होणार आहे. यात पहिलं फीचर आहे रिअॅक्शनचं. यात यूजर्सला डिसलाईकचा ऑप्शन देखील येणार आहे. सोबतच ट्विटर कंपनी ट्विटरचा लोगो म्हणजे चिमणीला देखील फेस्टिव्हल्सच्या हिशोबाने बदलण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही फीचर्सची टेस्टिंग सध्या सुरु आहे. लवकरच हे दोन्ही फीचर्स जारी केले जातील अशी माहिती आहे.
रिअॅक्शन फीचर काय आहे?
एका रिपोर्टनुसार कंपनी काही दिवसांपासून रिअॅक्शन फीचरवर काम करत आहे. याची टेस्टिंग देखील जोरात सुरु आहे. या फीचरमध्ये फेसबुकप्रमाणे यूजर्सला रिअॅक्शनच्या स्मायली दिल्या आहेत. यात चार ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात टियर्स ऑफ ज्वॉय, थिंकिंग फेस, क्लॅपिंग हॅंड्स आणि क्राईंग फेस. हे सर्व इमोजी फॉर्मेटमध्ये असेल. यूजर याचा वापर ट्विटवर रिअॅक्ट होण्यासाठी करु शकतील. सोबतच यामध्ये ट्विटर डाउनवोट्स (डिसलाइक) बटन देखील देणार आहे, अशी माहिती आहे.
2. उत्सवांना बदलणार ट्विटरचा लोगो
रिपोर्टसनुसार, ट्विटर एका नव्या सिजनल आयकॉनवर देखील काम करत आहे. यामध्ये वेगवेगळ्या फेस्टिव्हल्सच्या हिशोबाने कंपनी आयकॉन बदलणार आहे. याचे देखील टेस्टिंग सुरु आहे. हे आयकॉन नवीन वर्ष, ख्रिसमससह अन्य सणांच्या वेळी बदलत राहतील. याच्या बॅकग्राउंडला वेगवेगळ्या थीम आणि रंगसंगतीनं आकर्षक बनवलं जाणार आहे.
37 वर्षीय पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ
जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिल्यानंतर 37 वर्षीय पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पराग अग्रवाल यांनी बॉम्बे आयआयटीमधून शिक्षण घेतलं आहे. पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्वीटर कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आता पराग यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली आहे.
संबंधित बातम्या
- Parag Agrawal Twitter CEO : पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ
- Parag Agrawal Twitter CEO: धोनीच्या षटकारानंतर धिंगाणा, वर्ल्डकप विजयानंतर रस्त्यावर येऊन जल्लोष; ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांचं क्रिकेटप्रेम
- Parag Agrawal : भारतीयांकडून पराग अग्रवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, भन्नाट मीम्स व्हायरल
'हा इंडियन सीईओ व्हायरस, यावर लस नाही'; पराग अग्रवाल यांच्यावर आनंद महिंद्रांची स्तुतीसुमनं
Parag Agrawal salary : वय अवघं 37 वर्ष, ट्विटरच्या CEO पदी वर्णी, पराग अग्रवाल यांचा पगार किती?