iPhone: अॅपल कंपनीचा आयफोन केवळ फिचर्समुळं नव्हे तर त्याच्या किंमतीमुळंही जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? ज्या फोनची जगभरात क्रेझ आहे, त्या फोनचे पार्ट्स अॅपल स्वत: बनवत नाही. आयफोनच्या पार्ट्सची निर्मिती विविध देशांतील कंपन्या करतात. या पार्ट्सची नेमकी किंमत किती? आयफोनच्या एका स्मार्टफोनची निर्मिती करण्यासाठी एकूण किती खर्च येतो? याची खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आपण आयफोन 12 ची निर्मिती करण्यासासाठी कंपनीला एकूण किती खर्च येतो? याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
टोकियोस्थित रिसर्च स्पेशालिस्ट फोमलहॉट टेक्नो सोल्युशन्सनं त्यांच्या संशोधनात या स्मार्टफोनच्या उत्पादन खर्चा विषयी सांगितली आहे. ज्यात आयफोनची उत्पादक किंमत आणि बाजारातील किंमत यांच्यात मोठा फरक पाहायला मिळतोय. कर, आयकर शुल्क आणि इतर कारणांमुळं आयफोनची बाजारातील किंमत वाढते, अशीही माहिती समोय येत आहे.
आयफोनमध्ये विविध कंपनीचे पार्ट्स
आयफोनमध्ये मॉडेम हा सर्वात महागडा पार्ट्स असतो. आयफोन 12 च्या 5जी मॉडेमची किंमत सुमारे 90 डॉलर इतकी म्हणजे भारतीय चलनानुसार 6 हजार 700 रुपये एवढी आहे. आयफोनमध्ये बहुतेक मॉडेल्समध्ये सोनीचा कॅमेरा वापरतो. आयफोन 12 मध्ये सोनीचा कॅमेरा देण्यात आलाय. त्याची किंमत सुमारे 8 डॉलर म्हणजेच 600 रुपयांपर्यंत आहे. आयफोन 12 मध्ये सॅमसंगच्या ओएलईडी डिस्प्लेचा वापर केला जातो, याची किंमत जवळपास 70 डॉलर म्हणजे 5 हजार 200 च्या आसपास आहे. याशिवाय, या स्मार्टफोनचे इतर पार्ट्स दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेत बनवले जातात. आयफोनची एकूण किंमत 28 हजारांच्या जवळपास आहे. यानंतर अॅपल आयफोनची विक्री विविध देशांमध्ये वेगवेगळ्या दरानं विक्री करते. भारतात आयफोनची किंमत वेगवेगळ्या प्रकारांनुसार सुमारे 55 ते 70 हजार रुपये इतकी आहे.
भारतात आयफोनची किंमत कशी ठरते
भारतात वेगवेगळ्या करांमुळे या फोनची किंमत खूप वाढते. आयफोन 13 भारतात आयात केला तर त्यावर 22.5 टक्के कस्टम ड्युटी लागू होते. याशिवाय, या स्मार्टफोनवर जीएसटीही आकारला जातो. आयफोनसाठी जीएसटीच्या सध्याच्या दरानुसार, खरेदीदाराला सुमारे 11 हजार रुपयांचा जीएसटी भरावा लागतो.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
OnePlus 9RT भारतात दुसऱ्या नावाने होणार लाँच? काय असेल नाव?
Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! मिळवा फ्री 500MB डेटा; जाणून घ्या नव्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल