मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकपाठोपाठ आता ट्विटरचेही डेटा लीक प्रकरणात हात काळे झाले असल्याचं उजेडात आलं आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र ‘द संडे टेलिग्राफ’च्या अहवालानुसार ट्विटरनेही केंब्रिज अॅनालिटिकाला डेटा विकल्याचं उघड झालं आहे.
कॅम्ब्रिज अनालिटिकाचा संस्थापक अलेक्जांद्र कोगनने 2015मध्ये ट्विटरकडून यूजर्स डेटा खरेदी केला होता. यासाठी त्याने ग्लोबल सायन्स रिसर्च नावाने एक फर्म तयार केली होती. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, कोगनने अनेक यूजर्सचे ट्वीट, यूजरनेम, फोटो, प्रोफाईल फोटो, आणि लोकशन हा संपू्र्ण डेटा मिळवला होता.
डेटा का खरेदी केला जातो?
ट्विट्स आणि सोशल मीडियावरुन लोकांची मानसिकता समजून घेण्यासाठी कंपन्या डेटा विकत घेतात. कारण की, ते आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी त्याप्रमाणे प्लॅनिंग करतात. पण सध्या लोकांचे राजकारणाबद्दल सामान्य मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी डेटा खरेदी केला जात असल्याचं म्हटलं आहे.
ट्विटरचं स्पष्टीकरण
दरम्यान, केंब्रिज अॅनालिटिका आणि जीएसआरसारख्या कंपन्यांच्या जाहिराती घेणंही बंद केल्याचं स्पष्टीकरण ट्विटरने दिलं आहे. तसंच कोणताही डेटा चोरला गेला नाही किंवा विक्री झाली नसल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.
फेसबुकपाठोपाठ ट्विटरनेही डेटा विकला, ‘द संडे टेलिग्राफ’चा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2018 08:39 AM (IST)
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकपाठोपाठ आता ट्विटरचेही डेटा लीक प्रकरणात हात काळे झाले असल्याचं उजेडात आलं आहे.
ट्विटर - ट्विटरही चीनमध्ये ब्लॉक आहे. 2009 मध्येच चीनमध्ये ट्विटर ब्लॉक करण्यात आलं आहे. मात्र VPN च्या माध्यमातून 10 लाख यूझर्स ट्विटरचा वापर करतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -