iphone 13 Discount Offer : आपल्याकडेही अॅपल आयफोन असावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तरुणाईचा सर्वाधिक कल आयफोन घेण्याकडे असतो. पण बजेटबाहेर असल्यामुळे अनेकजण अॅन्ड्रॉईड फोनचा पर्याय स्विकारतात. सध्या कंपनीकडून Apple च्या iPhone 14 ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण अॅपलच्या चौदाव्या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर Apple सध्या iPhone 13 वर बंपर सूट देत आहे. Apple iPhone 13 ची किंमत सध्या 79,900 रुपये आहे. पण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या बंपर डिस्काउंटमुळे  iPhone 13 केवळ 52,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 


अॅपल आयफोन 13वर दिली जाणारी ही ऑफर Apple Authorised Reseller India iStore वर मिळतेय. तसं पाहायला गेलं तर आयफोन 13 ची किंमत 79,900 रुपये आहे. पण ऑनलाईन 128 GB इंटरनल स्टोरेज असणारा iPhone 13 अॅपलच्या India iStore वर  5,000 रुपयांच्या डिस्काउंटवर मिळणार आहे. ज्याची किंमत एकूण 74,900 रुपये आहे. पण आता या किमतीवर आणखी डिस्काउंट मिळणार आहे. 


4,000 रुपयांची अतिरिक्त सवलत


जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) कार्ड असेल तर तुम्ही आणखी डिस्काउंट मिळवू शकता. पण जर नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क करून त्यांच्या कार्डवरून या सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही HDFC कार्ड वापरत असल्यास, ऑफरनंतर तुम्हाला iPhone 13 वर रु.4,000 ची अतिरिक्त सूट मिळेल. आता HDFC कार्ड वापरल्यानंतर iPhone 13 ची किंमत 70,900 रुपये होईल. 


एक्सचेंज ऑफर


आयफोन 13 वर आणखी डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे, एक्सचेंज ऑफर. तुम्ही तुमचा जुना किंवा पूर्वीचा आयफोन एक्सचेंज केला, तर तुम्हाला तो आणखी स्वस्त मिळेल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, चांगल्या स्थितीतील iPhone XR किंवा इतर iPhones वर 18,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सूट उपलब्ध आहे. आता सर्व सवलतींनंतर, तुम्ही 52,900 रुपयांपर्यंतच्या किमतीत HDFC कार्ड वापरून iPhone 13 घेऊ शकता. 


iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स 


या डीलमध्ये iPhone 13 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटबद्दल बोलले जात आहे. हा स्मार्टफोन A15 बायोनिक चिपवर काम करतो. या 5G फोनमध्ये 13 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यासोबतच फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप आणि 12MP चे दोन सेन्सर देण्यात आले आहेत. यामध्ये फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. ड्युअल सिम सेवेसह या फोनमध्ये एक वर्षाची वॉरंटीही मिळणार आहे.