Poco F4 5G First Sale : Poco F4 5G ची आज म्हणजेच, 27 जून 2022 रोजी पहिला सेल होणार आहे. आज पोकोचा हा स्मार्टफोन पहिल्यांदा विक्रिसाठी  उपलब्ध होणार आहे. फोनच्या इंट्रोडक्ट्री किंमतीवर 4000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. पण ही ऑफर केवळ काही कालावधीसाठीच असणार आहे. जर तुम्ही HDFC कार्ड वरुन Poco F4 5G स्मार्टफोन खरेदी केला, तर तुम्हाला 3000 रुपयांचा इस्टंट डिस्काउंट आणि 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन  3000 रुपयांच्या सूटवर खरेदी करता येईल. Poco F4 5G च्या खरेदीवर 2 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटीही दिली जाणार आहे. त्यासोबतच Poco F4 5G च्या खरेदीवर 2 महिन्यांसाठी YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्यासोबतच, 1 वर्षापर्यंत Disney+ Hotstar चं मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. 


Poco F4 5G चे फिचर्स  



  • Poco F4 5G स्मार्टफोनला अल्ट्रा-थिन 7.7mm अल्ट्रा-थिन डिझाइनमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे.  

  • Poco F4 5G मध्ये 10 5G बँड्सचा सपोर्ट मिळणार आहे. 

  • Poco F4 5G मध्ये 6.67-इंचाचा 120Hz एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच 360Hz टच सँपलिंग सपोर्ट दिला गेला आहे. फोन 1300 nits च्या पीक ब्राइटनेससोबत येणार आहे.  

  • प्रोसेसर सपोर्ट म्हणून Poco F4 5G स्नॅपड्रॅगन 870 सपोर्ट देण्यात आला आहे. 

  • Poco F4 5G मध्ये 3.2GHz चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. 

  • Poco F4 5G फोन नवी लिक्विड-कूल टेक्नोलॉजी 2.0 आणि UFS 3.1 स्टोरेजसोबत सादर होणार आहे.  

  • Poco F4 5G स्मार्टफोन ट्रिपल आणि व्हिडीओ कॉलसाठी 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • Poco F4 5G मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबतच 67W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 

  • Poco चा दावा आहे की, फोनला 0-100 टक्के चार्ज्ड होण्यासाठी केवळ 38 मिनिटांचा वेळ लागतो. 


Poco F4 5G ची किंमत


Poco F4 5G तीन व्हेरियंट्समध्ये लॉन्च केला जाईल. याच्या 6 GB रॅमसोबत 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर 8 GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 25,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅमसोबत 256 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 29,999 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. Poco F4 5G स्मार्टफोन नेबुला ग्रीन आणि नाईट ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये मार्केटमध्ये सादर करण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


प्रतीक्षा संपली! ओप्पो ने भारतात लॉन्च केला Oppo A57 4G,जाणून घ्या याचे फीचर्स आणि किंमत