Parag Agrawal And Shreya Ghoshal:  ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिला असून नुकतीच त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले. अनेकांनी पराग अग्रवाल यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. पण सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालची (Shreya Ghoshal) पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या 11 वर्षा पूर्वीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे श्रेया आणि पराग यांचे कनेक्शन  काय आहे ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.


काय आहे पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल कनेक्शन? 
पराग आणि श्रेया बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत.  2010 मध्ये श्रेया घोषालने एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये श्रेयाने लिहिले होते, 'माझा बालपणीचा मित्र पराग. त्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. तसेच त्याला भटकंती करायला देखील आवडते. तो एक स्टॅनफोर्ड स्कॉलर आहे. त्याचा काल वाढदिवस होता. सर्वांनी त्याला शुभेच्छा द्या.' या श्रेयाच्या ट्वीटला पराग यांनी रिप्लाय देखील दिला होता. 






पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या CEOपदी नियुक्ती झाल्यावर श्रेयाने ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या . श्रेयाने ट्वीट केले, 'अभिनंदन पराग, आम्हाला तुझा अभिमान आहे. आमच्यासाठी हा एक महत्वाचा दिवस आहे'






कोण आहेत पराग अग्रवाल
भारतात जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. ट्वीटरशिवाय त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&Tयासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे. 


संबंधित बातम्या :


Parag Agrawal Twitter CEO : आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण, इतकी आहे संपत्ती, जाणून घ्या ट्वीटरच्या नव्या सीईओबद्दल...


Kangana Ranaut Reacts : पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ, कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया