Tesla Car : अमेरिकेतील नामांकीत ऑटो कंपनी टेस्लाच्या भारतात कार लॉन्चिंगच्या चर्चा होत आहेत. काही दिवसांपूर्वी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत टेस्लाची कार भारतात येणार असल्याची घोषणा केली होती. अशातच भारताच्या रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान टेस्ला कार दिसून आली. टेस्लाची एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार Model 3 टेस्टिंग दरम्यान दिसून आली. अशातच आता हिचं Model Y भारताच्या रस्त्यावर धावताना दिसून आलं. ज्यावरुन हे दिसून येतं की, ही गाडी लवकरच भारतात लॉन्च होणार आहे.
असं असेल डिझाइन
टेस्लाचं Model Y कंपनीच्या Model 3 सारख्याच एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या दोन्ही व्हेरियंटचं डिझाइन जवळपास सारखंच आहे. ज्यामध्ये फ्रंट अँडवर एलईडी हेडलाइट्स, इंटीग्रेटिड डीआरएल यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. त्यासोबतच Model Y चा फ्रंट बंपर मॉडल 3च्या तुलनेत थोडा अधिक फ्लॅट आणि स्पोर्टियर आहे. अशातच Model Y च्या साइडमध्ये समान क्रीजसोबच अलॉय व्हील देण्यात आले आहे.
अद्ययावत फिचर्सनी सुसज्ज
Model Y ला 15 इंचाचा मोठा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व फिचर्ससाठी कंट्रोल देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इतर फिचर्समध्ये इलेक्ट्रिक अॅडजेस्टेबल फ्रंट सीट्स, हीटेड फ्रंट आणि रियर सीट्स तसेच, हाय क्वॉलिटीता 14-स्पीकर साउंड सिस्टिम, HEPA एयर फिल्ट्रेशन सिस्टम यांचाही समावेश आहे. खास गोष्ट म्हणजे, Tesla Model Y ला 5-सीटसोबतच 7-सीट कॉन्फिगर करता येऊ शकतं.
टेस्लाचा टॉप स्पीड काय असेल?
टेस्ला कारचा टॉप स्पीड प्रतितास 217 किमी इतका असेल. ही कार 4.8 सेकंदांमध्ये प्रति तास 0-96 किमी इतकाच वेग वाढवू शकते. त्याबरोबर Model Y ची बॅटरी पॅख सिंगल चार्ज केल्यानंतर जवळपास 525 किमीपर्यंत चालते. म्हणजेच, एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात आरामात जाऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :