Reliance Jio: रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशातील आणखी 11 नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून (Reliance Jio 5G Launched in 11 Cities), ज्यात राज्यातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि नाशिक( Nashik) शहरात जिओने 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, दोन्ही शहरातील जिओ युजर्सला नवीन वर्षांची गिफ्ट दिली आहे. सोबतच देशातील आणखी काही शहरात देखील या नवीन वर्षात जिओने 5G सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. 


लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद आणि चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी याठिकाणी जिओने 5G सेवा करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात 5G सेवा अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर जिओ 5G नेटवर्कशी जोडलेल्या या 11 नवीन शहरांतील जिओ वापरकर्त्यांना 'जिओ वेलकम ऑफर' (Jio Welcome Offer) अंतर्गत आमंत्रित केले जाईल. त्यानंतर निमंत्रित जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps पेक्षा जास्त वेगाने अमर्यादित डेटा मिळणार आहे.


याबाबत बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एकाच वेळी 11 शहरांमध्ये 5G सुरू केल्याचा आम्हाला आनंद असून, अभिमान वाटतोय. आम्ही जिओ 5G सेवा सुरू केल्यापासून एकाचवेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात सेवा सुरू करण्याची पहिलीच वेळ आहे. या 11 शहरांमधील लाखो Jio वापरकर्ते Jio true 5G तंत्रज्ञानाच्या फायद्यांसह 2023 ची सुरुवात करतील. तर महत्त्वाची पर्यटन स्थळे असण्याबरोबरच ही शहरे आपल्या देशाची प्रमुख शैक्षणिक केंद्रेही आहेत. त्यामुळे जिओच्या 5G सेवांच्या लॉन्चमुळे, ई-गव्हर्नन्स, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि या क्षेत्रांमध्ये विकासाची नवीन दारे खुली होतील,असा दावा जिओकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची 90 वी जयंती आहे. तसेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना रिलायन्सची सुत्रे हाती घेऊन आज 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. या 20 वर्षात त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एका विशिष्ट उंचीवर पोहोचवलं आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Pune Raj thackeray : मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान