Twitter Down Globally : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची (Twitter) सेवा बुधवारी सकाळपासून डाऊन झाली होती. Downdetector.com या वेबसाईटच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून जगभरात ट्विटर डाऊन झाले होते. हजारो ट्विटर वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्यात अडथळे येत होते. मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्ही युजर्सना ट्विटरच्या साइटवर लॉग इन करण्यात अडचण येत होती. युजर्संना 'काही बिघाड आहे, पुन्हा प्रयत्न करा' (Something is Error. Please try again) असे पॉप-अप मेसेज येत होते.


जगभरात ट्विटर डाऊन


वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये सकाळी 7:40 पर्यंत 10,000 हून अधिक युजर्सना ट्विटर वापरण्यात अडचणी येत होत्या. काही युजर्सनी सांगितले की, त्यांच्या अकाऊंटमवरून सारखे लॉग आउट होत आहेत, तर इतरांनी तक्रार केली की त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट किंवा मेसेज करण्यात अडथळे येत आहेत.


मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन


एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाले आहे. याआधी 04 नोव्हेंबर रोजीही ट्विटरची सेवा ठप्प झाली होती, मात्र काही वेळानंतर ती पुन्हा पूर्ववत झाली.






दरम्यान, काही भागात ट्विटरची सेवा पूर्ववत झाली आहे. तर काही भागात ट्विटर वापरण्यात अजूनही अडथळे येत आहेत. काही भागात ट्विटर सुरु झाल्यानंतर युजर्सने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. तर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्सही व्हायरल केले आहेत. 


पाहा भन्नाट व्हायरल मीम्स


 






एका नेटकऱ्याने ट्विटरच्या नव्या कर्मचाऱ्याची कशी अवस्था असेल ते मीम्समधून सांगितलं आहे.






दुसऱ्या एका नेटकऱ्याने ट्विटर कंपनीतील इंजिनिअर्स कशाप्रकारे तांत्रिक बिघाड दूर करत असतील, हे सांगितलं आहे.






आणखी एका नेटकऱ्याने तर हा सोशल मीडियाचा नाद सोडून बालपणीच्या खेळांमधील फोन वापरण्याचं म्हटलं आहे.