आजकाल, आधार कार्ड आपलं सर्वात महत्वाचं कागदपत्रं झाले आहे. प्रत्येक कामात आधारकार्ड आवश्यक आहे. या माध्यमातून बर्‍याच सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारने आता क्यूआर कोड जोडला आहे. ज्याच्या मदतीने त्याचा वापर सुलभ झाला आहे.


QR कोडमुळे ऑफलाइनही वापर होणार


सरकारने PVC आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यात क्यूआर कोड जोडला आहे. मोबाइलवरून हा QR कोड स्कॅन करताच तुमची सर्व माहिती आपल्यासमोर येईल. विशेष म्हणजे यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत आपल्याला आता सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल. PVC कार्डवर आधार छापण्यासाठी 50 रुपये फी भरावी लागते. पीव्हीसी कार्ड एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, जे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारखेच आहे.


WhatsApp मध्ये पेमेंट सेटअप अ‍ॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप


PVC वर आधार कार्ड करण्यासाठी काय कराल?


पीव्हीसीवरील आधार कार्डसाठी प्रथम यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर जा. (https://uidai.gov.in) त्यानंतर तुम्हाला My Aadhar Section वर जाऊन Order Aadhar PVC Card पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर सुरक्षा कोड टाकण्याची मागणी केली जाईल. त्यानंतर आपणास OTP क्रमांकासाठी विचारले जाईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर आपण सबमिट करा. असे केल्याने आधारशी संबंधित तपशील आपल्या स्क्रीनवर येईल. यानंतर, आपल्याला पैसे देण्यास सांगितले जाईल आणि आपण 50 रुपये भरताच आपली ऑर्डर दिली जाईल. काही दिवसातच कार्ड आपल्या घरी येईल.