मुंबई : स्मार्टफोन कंपनी वनप्लसचा नवा मोबाईल वनप्लस नॉर्ड लॉन्च करण्यात आला आहे. या फोनचं लॉन्चिंग गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या OnePlus Nord AR अॅपमार्फत करण्यात आलं. वनप्सलचे कोफाउंडर कार्ल पेई यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वनप्लस 8 सीरीज आतापर्यंतच्या वनप्लसच्या सीरीजपैकी सर्वात सक्सेसफुल सीरीज आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, वनप्लस नॉर्ड तयार करताना कंपनीने कम्युनिटी फिडबँक लक्षात घेतला. त्यानंतर पेई यांनी वनप्लस नॉर्ड लॉन्च केला.


वनप्लस नॉर्ड कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असण्यासोबतच 5जी सपोर्टेबल असणार आहे. आतापर्यंतच्या स्मार्टफोन्सपैकी हा देशातील सर्वात कमी किमतीचा 5जी सपोर्टेबल स्मार्टफोन आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी वनप्लस नॉर्डमध्ये फास्ट आणि स्मूथ एक्सपिरियन्ससाठी 300 ऑप्टिमायजेशन केले आहेत. भारतात वन प्लस नॉर्डची किंमत 24,999 रुपयांनी सुरु होऊ शकते. 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी 24,999 तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी 27,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी 29,999 रुपये मोजावे लागू शकतात.



व्हेरियंट्स, किंमत आणि सेल


OnePlus Nord च्या 8GB आणि 12GB रॅम व्हेरियंटची विक्री अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या साइटवर चार ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच या स्मार्टफोनचा 6 GB रॅम असणारा स्मार्टफोन सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.


OnePlus Nord मध्ये 6.44 इंच फुल एचडी प्लस फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट इतका आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरासेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल प्राइम कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ लेंस असणार आहे. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी याच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.


अर्ध्या तासात 70 टक्के चार्ज


परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. पावरसाठी या फोनमध्ये 4115mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30T फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फक्त 30 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन 70 टक्के चार्ज होतो. कनेक्टिविटीसाठी हा फोन 4G व्यतिरिक्त 5G ला सपोर्ट करणार आहे.


रियलमी एक्स50 प्रो सोबत स्पर्धा


रियलमीने सर्वात आधी भारतात 5G सपोर्टेबल रियलमी एक्स50 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 एसओसीसोबत येतो. यामध्ये 128जीबी रॅम आणि 256जीबी यूएफएस 3.0 देण्यात आलं आहे. यामध्ये अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 4200एमएएच एवढी आहे. तसेच 6.44 इंच एवढा डिस्प्ले देण्यात आला आहे. याची किंमत 37999 रूपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


OnePlusचा सर्वात स्वस्त फोन Nord आज होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स


स्मार्टफोनचं Gmail स्टोरेज फुल झालं आहे? 'या' ट्रिक्स करतील मदत

Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग