नवी दिल्ली : स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या स्वस्त आणि खास फिचर्सने परिपूर्ण अशा वनप्लस स्मार्टफोन युजर्स आतुरतेने वाट पाहत होते. तो आज भारतात लॉन्च होणार आहे. OnePlus आज आपला नवा फोन 'Nord' लॉन्च करणार आहे. असं सांगण्यात येत आहे की, हा फोन कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनचं लॉन्चिंग गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या OnePlus Nord AR अॅपमार्फत करण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे.
OnePlus Nord स्पेसिफिकेशन
OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाले तर यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट, 6 जीबी रॅम, 6.65 इंच स्क्रीन आणि 3 रियर कॅमेरा असणार आहेत. हँडसेटमध्ये स्क्रिनवर एक पंच-होल कटआउट असणार आहे. हा फोन ड्युअल फ्रंट कॅमेऱ्यासोबत लॉन्च करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त यामध्ये पॉवरफुल बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. असं सांगण्यात येत आहे की, नव्या OnePlus Nord ची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
Vivo च्या या फोनसोबत बाजारात कॉम्पिटिशन
OnePlus Nord ची स्पर्धा Vivo V19 सोबत होणार आहे. किमतीबाबत बोलायचे झाले तर V19 च्या 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज असणाऱ्या वेरियंटची किंमत 27,990 रुपये असणार आहे. हा फोन Piano Black आणि Mystic silver अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. नव्या V19 मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मेंससाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.
फोटोग्राफीसाठी यामध्ये 48MP + 8MP + 2MP+2MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी याच्या फ्रंटमध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 32MP+ 8MP चे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 33Wच्या फास्ट चार्जिंग फिचरसोबत देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
स्मार्टफोनचं Gmail स्टोरेज फुल झालं आहे? 'या' ट्रिक्स करतील मदत
Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग