मुंबई : आपल्यापैकी अनेकजण आपल्या GMail अकाउंटच्या स्टोरेजच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा आपल्याला एक मेसेज येतो की, GMail स्टोरेज फुल झालं असून तुम्हाला मेल डिलीट करावे लागतील. Google यूजर्सना फ्रीमध्ये एकूण 15GB स्टोरेज मिळतं. यामध्ये ड्राईव्ह फाईल्स, ईमेल, व्हाट्सअॅप बॅकअपसह इतर काही अॅप्ससाठी स्टोरेज देण्यात येतं. जर तुमच्याकडे Android फोन असेल तर 15GB स्टोरज लगेच फुल होतं.
गूगड फॉरम स्टोरेजवर यासंदर्भात तुम्हाला याची माहिती सहज मिळते. त्यामध्ये दोन पर्याय दिलेले असतात, ज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे, Google ने यूजर्सना दिलेल्या 15GB स्टोरेज व्यतिरिक्त 100GB क्लाउड स्टोरेजसाठी प्रति महिना 130 रुपये भरावे लागतील. तसेच दुसरा पर्याय असतो की, नवीन मेल प्राप्त करण्यासाठी काही मेल डिलीट करावे लागतील.
तीन पद्धती आहेत, ज्यांच्यामार्फत तुम्ही तुमचं Google अकाउंटमधील स्टोरेजमधील फुल झालेली मेमरी रिकामी करू शकता. Google डिस्कमध्ये साइजनुसार, फाइल्स, मेल आणि Google फोटो डिलीट करू शकता.
1. गूगल ड्राइव्हमध्ये साइजनुसार, फाइल्स डिलीट करा.
- पीसी किंवा डेस्कटॉपआधी येथे जा - https://drive.google.com/#quota
- आपल्या GMail अकाउंटने लॉगइन करा.
- त्यानंतर तुम्हाला साइजनुसार, फाइल्स दिसतील.
- ज्या फाइल्सची तुम्हाला गरज नाही. त्या तुम्ही डिलीट करू शकता.
2. मेल डिलीट करा
- गूगल अकाउंटमध्ये सर्वात आधी लॉग इन करा.
- सर्च बारमध्ये जाऊन has:attachment larger:10M सर्च करा.
- त्यानंतर जे मेल 10mb पेक्षा मोठे असतील ते दिसतील.
- त्यातील ज्या मेलची गरज नाही, ते डिलीट करा.
- त्यानंतर ट्रॅशमध्ये जाऊन त्यातील सर्व मेल्स डिलीट करा. आता स्पॅम फोल्डरमध्ये जा आणि तेथील सर्व ईमेल्स डिलीट करा.
3. गूगल फोटो
- ब्राउझरमध्ये https://photos.google.com/settings ही लिंक सर्च करा.
- गूगल अकाउंटमध्ये लॉगइन करा.
- अपलोड क्वॉलिटी ऑप्शनमध्ये जाऊन ओरिजनल ते हायपर्यंत चेंज करा
त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टोरेज रिकव्हर करण्यासाठी ऑप्शन येईल. त्यामुळे तुमचे आधीचे अपलोड फोटोज ओरिजनल अपलोडमधून हाय क्वॉलिटीमध्ये चेंज होतील. त्यामुळे तुम्हाला स्टोरेज मेमरी रिकामी होण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्स अॅपवरून फोटो डिलीट झाले?; 'ही' ट्रिक वापरून पुन्हा मिळवा!
Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग
जोकर.! हा हसवत नाही तर रडवतो; महाराष्ट्र सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा