मुंबई : सध्या सोशल मीडियावरील स्टेटस फिचर सर्वात लोकप्रिय आहे. Facebook, Instagram पासून ते अगदी व्हॉट्सअॅपमध्येही युजर्सना स्टेटस फिचर मिळतं. लोक आपला फोटो, विचार किंवा कोणताही व्हिडीओ स्टेटस म्हणून ठेवू शकतात. व्हॉट्सअॅपचं स्टेटस फिचरला जवळपास एक वर्ष झालं परंतु, तरीही याची क्रेज अजून कमी झालेली नाही. हे फिचर युजर्सना फार आवडतं.
Whatsapp वर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ स्टेटस म्हणून पोस्ट करण्यात येतात. खास गोष्ट म्हणजे, व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तसांनी आपोआप निघून जातं. अशातच अनेकदा आपल्याला एखाद्या मित्राचं किंवा नातेवाईकांचं स्टेटस पाहून डाऊनलोड करण्याची इच्छा होते. अनेकदा फोटो स्क्रिनशॉर्ट काढून सेव्ह करता येतो, पण व्हिडीओ डाऊनलड करणं शक्य होत नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्टेटस सहज डाऊनलोड करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या फोनमधल्या त्या हिडन फोल्डरबाबत जिथे तुमच्या स्टेटसचे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होतात. आणि तुम्हाला समजतंही नाही. जाणून घेऊयात फोनमध्ये लपलेल्या या हिडन फोल्डरबाबत...
आपल्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल की, तुमच्या फोनमध्येच एक असं फोल्डर असतं. जिथे व्हॉट्सअॅप स्टेटसचे फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड होतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या स्टेटसवर क्लिक करता. त्यावेळी तो फोटो आणि व्हिडीओ एका फोल्डरमध्ये डाऊनलोड होतो. सर्वात आधी status फोल्डर अनहाइड करावं लागेल. status फोल्डर अनहाइड करण्यासाठी फोन रिबूट किंवा आयओएस डिव्हाइसला जेलब्रेक करण्याची गरज अजिबात नाही.
त्यासाठी तुम्हाला फक्त File Manager मध्ये मेन्यू बारमध्ये जायचं आहे. तिथे एक सेटिंग्सचं ऑप्शन दिसेल. Settings वर क्लिक केल्यानंतर एक Unhide Files चा ऑप्शन दिसेल. अनहाइडवर क्लिक केल्यानंतर फाइल मॅनेजरमध्ये एक WhatsApp फोल्डर असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक Media फोल्डर दिसेल. मीडिया फोल्डरमध्ये गेल्यानंतर आणखी एक status नावाचं हिडन फोल्डर दिसेल. याच फोल्डरमध्ये तुम्ही पाहिलेले स्टेटसचे सर्व फोटो आणि व्हिडीओ सेव्ह होतात.
पाहा व्हिडीओ : पबजीसह 118 चीनी अॅप्सवर केंद्र सरकारकडून बंदी
इतर अॅपही आहेत
व्हॉट्सअॅप आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. व्हॉईस कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग, चॅट आणि स्टेटस यांसारखे फिचर्स सर्वात जास्त वापरले जातात. लोकांमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याचीही क्रेझ आहे. हे स्टेटस डाऊनलोड किंवा सेव्ह करण्यासाठी अनेक अॅप्स अस्तित्वात आहेत. दरम्यान, या अॅप्सना WhatsApp ने लॉन्च केलेलं नाही. पंरतु, थर्ड पार्टि अॅप्सचा वापर करून तुम्ही अगदी सहज व्हॉट्सअॅप स्टेटस डाऊनलोड करू शकता. तुम्ही असे अॅप्स Google Play Store वरून डाऊनलोड करू शकता. परंतु, असे अॅप्स तुमच्या डेटासाठी घातक ठरू शकतात. हे अॅप्स सुरक्षित असतीलच असं नाही. त्यामुळे इतर कोणत्याही अॅपऐवजी तुम्ही फोनमधील फिचरचाच वापर करणं फायदेशीर ठरतं.
महत्त्वाच्या बातम्या :