मुंबई : अवघ्या काही तासातच झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक युआन यांच्या संपत्तीत तब्बल 4.2 बिलियन डॉलर्सची वाढ झाली.  काल दिवसाअखेर त्यांच्या व्हर्च्यूअल मीटिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांनी वाढ होवून ती 410 डॉलर्सवर पोहोचली आणि त्यात अ़जून वाढ होत आहे. ही वाढ जर मंगळवारपर्यंत अशीच राहिली तर युआनची संपत्ती 20 बिलियन डॉलर्सच्या पुढं जाण्याची शक्यता आहे.


हे वर्ष तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील श्रीमंतांच्या संपत्तीतील वाढीसाठी चर्चेत राहीलं. अमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी त्यांची संपत्ती जुलैच्या एकाच दिवसात तब्बल 13 बिलियन डॉलर्सनी वाढताना पाहिली आणि टेस्लाच्या इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 24 तासात 8 बिलियन डॉलर्सची भर पडली. गेल्या आठवड्यात या दोघांच्याही संपत्तीत विक्रमी वाढ झाली. बेझोस यांनी 200 बिलियन डॉलर्सचा टप्पा तर मस्क यांनी 100 बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला.


झूम कंपनीला कोरोना व्हायरसमुळे स्पष्टपणे आर्थिक फायदा मिळाल्याच दिसतयं. या काळात व्यापार आणि शैक्षणिक संस्थांनी दूरस्थपणे काम करण्याला प्राधान्य दिले.


सॉफ्टवेअर मेकरच्या अहवालानुसार, झूमच्या शेअरच्या विक्रीत तीन महिन्यात 355 टक्कयांनी वाढ होवून ती 663.5 मिलियन डॉलर्सवर पोहचली. ही वाढ मॉडर्ना या बायोटेक कंपनीच्या वाढीनंतर दुसरी सर्वात मोठी वाढ होती. झूमच्या मते येत्या जानेवारीच्या अखेरीस ती 2.39 बिलियन डॉलर्स इतकी होईल. म्हणजे एका वर्षात कंपनीच्या महसूलात तब्बल चौपट वाढ होईल.


कॅलिफोर्नियातील सॅन जोस या कंपनीचा संस्थापक, ज्याची संपत्ती त्याच्या 50 दशलक्षपेक्षा जास्त झूम शेअर्सपासून बनली आहे, तो या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या पंक्तीत जावून बसला. सोमवारी यूआनच्या समभागात पाचपटीनं वाढ झाल्याने त्याची संपत्ती 12.8 बिलियन डॉलर्सवर पोहचली.


प्रारंभी झूम गुंतवणूकदार ली का-शिंग आणि सॅम्युअल चेन यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचं दिसून आले. ब्लूमबर्ग बिलेनिअर निर्देशांकानुसार या दोघांनीही अजून शेअर आपल्याकडे ठेवले असून त्यांपासून त्यांना दिवसाअखेर अनुक्रमे 2 बिलियन डॉलर्स आणि 650 मिलियन डॉलर्सचा फायदा होण्याची शक्यता आहे.