TCL TV : हाय डेफिनेशनच्या युगात घरबसल्या देखील लोकांना अगदी क्लिअर आणि मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहायला आवडते. त्यामुळे जगातील आघाडीची एलसीडी टीव्ही ब्रॅण्ड कंपनीने गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर टीव्हीचे दोन नवे मॉडेल लॉन्च केले आहेत. 4K टीव्ही सी725 (TCL 4K C725) आणि 4K एचडीआर टीव्ही पी725 (4K HDR TV P725) अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.
टीसीएल सी725 4K या टीव्हीमध्ये उच्च दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीसह आणखी क्लियरटीसाठी QLED तंत्रज्ञान आणि आवाजासाठी डॉल्बी व्हिजन या सोयी देण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीमध्ये अनेक कनेक्टीव्हीटी वैशिष्ट्यांसह व्हिडिओ कॉल करण्याची व्यवस्थाही आहे. दमदार पिक्चर क्वॉलिटीसाठी आकर्षक कलर्स, सुधारित कॉन्ट्रास्ट आणि अद्वितीय सुस्पष्टतेची खात्री या टीव्हीतून मिळत असून या टीव्हीसह गुगल ड्युओ अॅपच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ कॉल्स करण्याची सुविधा देतो. दुसरीकडे
टीसीएल स्मार्ट एआय आणि अँड्रॉइड आर(11) ची ताकद असलेल्या पी725 मध्ये अत्याधुनिक इंटेलिजण्ट फंक्शन्स आणि अनेक मनोरंजन अनुभव देण्यासाठी मॅजिकल वेब कॅमेरा आहे. या टीव्हीमध्ये मेटलिक स्लिम बेझेल-लेस डिझाइन आणि इन्वर्टेड व्ही-शेप स्टॅण्डसह फॅब्रिक स्टॅक आहे, जे टीव्हीच्या मध्यभागी असून त्यामध्ये पॉवर एलईडी आहे.
किंमत किती?
गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर व्हिडिओ कॉल QLED 4के टीव्ही सी725 हा 53 हजार 990 रूपये या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा ब्रॅण्ड सुरुवातीला येणाऱ्यांना 17 हजार रूपयांचा ब्ल्यूटूथ स्पीकर मोफत मिळणार आहे. यासोबत ग्राहकांना 2 हजार 999 रूपयांचा व्हिडिओ कॉल कॅमेरा देखील मोफत मिळेल. ही ऑफर 10 एप्रिल, 2022 पर्यंतच उपलब्ध असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Oppo Smartphone : Oppo K10 आणि Enco Air 2 भारतात लॉन्च, 'या' ऑफरसह मिळतील भन्नाट फीचर्स
- WhatsApp : व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लाँच होणार, युजर 2GBची फाइल शेअर करू शकणार!
- गुगल मॅपवर 'ही' ठिकाणे पाहण्यास आहे मनाई, जाणून घ्या काय आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha