Lava Blaze 4G Launch In India : लावा (Lava) या कंपनीचा ब्लेज 4जी (Blaze 4G) हा फोन लवकरच भारतात लाँच करणार आहेत. या फोनमध्ये काही खास  स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स असणार आहेत. फोनमध्ये एलसीडी डिस्प्ले (LCD Display) असणार आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमत...
 
लावा ब्लेज 4जीचे डिझाइन (Lava Blaze 4G Design)
Lava Blaze 4G मध्ये पंच-होल कट-आउट  आणि  साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे. या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह कॅमेऱ्यांसाठी दोन कट-आउट्स देखील मिळू शकतात.  6.78 इंचाचे फुल-एचडी+ (1080x2460 पिक्सल) एलसीडी पॅनल या फोनमध्ये असेल. हा कलर दोन कलर ऑप्शनमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 


कॅमेरा  
फोनच्या बॅक पॅनलवर दोन कट-आऊटच्या आत क्वाड कॅमेरा असू शकतो. ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 5MB चा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मायक्रो आणि डेप्थ सेंटर असेल. या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देखील असेल.  


लवा ब्लेज 4जी  फीचर्स (Lava Blaze 4G Features)
लवा ब्लेज 4जीमध्ये मीडियाटेक डाइमेंशन 810 प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनमध्ये 8GB Ram आणि 128GB स्टोरेज देखील या फोनमध्ये मिळेल. हे स्टोरेज लिमिट तुम्ही मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन वाढवू शकता. 30W फास्ट-चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये असेल.  तसेच  5,000mAh बॅटरी या मोबाईमध्ये मिळेल.  4G डुअल-सिम, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एक 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि एक टाइप-सी पोर्ट या फोनमध्ये मिळेल. Lava Blaze 4G या फोनची किंमत 10,000 रुपये आहे. 


हेही वाचा: