Sony Waterproof Smartphone : भारतीय बाजारपेठेत सोनी (Sony) कंपनीचे नाव तसे मागे पडताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी, सोनी स्मार्टफोन्सची (Smartphone) प्रीमियम सिरीजमध्ये वेगळी ओळख असायची. Sony Xperia मोबाईल त्याच्या ग्लास बॉडी, डिझाइन तसेच त्याच्या लुकसाठी ओळखले जात होते. एनएफसी आणि आयपी रेटिंग सुविधा फक्त सोनी मोबाईलमध्ये उपलब्ध होती. असे म्हटले जाते की, सोनी भारतीय स्मार्टफोन मार्केटमधून बाहेर पडली होती, परंतु जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवत ही कंपनी 1 सप्टेंबर 2022 ला Sony Xperia 5 IV 5G फोन लॉन्च करणार आहे.
यूट्यूबवर टीझर पोस्ट
सोनीने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या टीझरद्वारे Xperia कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सोनीने कलाकार कॅट बर्न्ससोबत करार केला आहे. हा कोणता Xperia फोन आहे हे टीझरमध्ये उघड करण्यात आले नाही, परंतु असा अंदाज लावला जात आहे की, तो दीर्घ-चर्चा असलेला Xperia 5 IV आहे. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे आगामी Xperia स्मार्टफोनमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर असेल. डिव्हाइसला इतर Xperia 5 मालिका स्मार्टफोन्सप्रमाणे पॉकेट-फ्रेंडली डिझाइन मिळण्याची शक्यता आहे.
Sony Xperia 5 IV स्पेसीफिकेशन्स
कंपनीकडून डिव्हाइसबद्दल अद्याप माहिती देण्यात आली नसली तरी स्मार्टफोन नवीनतम Snapdragon 8+ Gen 1 Soc द्वारे समर्थित असेल अशी अपेक्षा आहे, परंतु जुन्या स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय 120Hz OLED डिस्प्ले, IP68 वॉटर रेझिस्टन्स, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर यामध्ये दिले जाऊ शकतात. डिव्हाइसची किंमत आणि इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. लाँचपूर्वी अधिक तपशील निश्चितपणे उघड होईल. अलीकडील FCC सूचीनुसार Xperia 5 IV चा डिस्प्ले 153.5mm (अंदाजे 6-इंच) असेल. याशिवाय, हे 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह सुसज्ज असेल.
सर्वांचा आवडता अॅपल फोनही लवकरच होणार लॉंच
सर्वांचा आवडता iPhone म्हणजेच Apple चा आगामी फोन (iPhone 14 Launch Date) 7 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Mini या Apple इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहेत. कंपनीनं त्याच्या लॉन्चिंग इव्हेंटसाठी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच, कंपनीकडून Apple Watch ची घोषणा देखील होऊ शकते.
संबंधित बातमी:
6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे
6G मध्ये मिळणार 5G पेक्षा 100 पट जास्त वेग, 142 तासांचा व्हिडीओ काही सेकंदात होईल डाउनलोड