6G Speed: भारतात अद्याप 5G सेवा सुरू झालेली नाही, मात्र जगभरात 6G ची चर्चा सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये 5G सेवा सुरू झाली असून अनेक लोक ती वापरत आहेत. अशा लोकांना आता नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानात रस आहे. 5G नंतर आता 6G चा नंबर आहे. 6G बाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात असले तरी, प्रत्यक्षात ही सेवा येण्यासाठी काही वर्षे लागतील. चीन आणि इतर देशांनी 6G वर काम सुरू केले आहे.


भारत देखील 6G साठी तयारी करत आहे. भारत सरकारने या वर्षी मार्चमध्ये सांगितले होते की, 2030 पर्यंत भारतात 6G नेटवर्क उपलब्ध होईल. 6G संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.


6G मध्ये इंटरनेट स्पीड किती असेल?


4G पेक्षा सुमारे 10 पट वेगवान 5G आहे. 6G बाबतही असेच अंदाज वर्तवले जात आहेत. 5G पेक्षा 6G चा वेग जवळपास 100 पट जास्त असेल. सिडनी विद्यापीठातील वायरलेस कम्युनिकेशन एक्सपर्ट Mahyar Shirvanimoghaddam यांच्या मते, 6GB नेटवर्कवर 1TB प्रति सेकंद इतका वेग मिळू शकतो. 6G वेगाने तुम्ही नेटफ्लिक्सचे 142 तासांचे हाय डेफिनेशन व्हिडीओ प्रति सेकंद डाउनलोड करू शकता. 6G तंत्रज्ञान लॉन्च झाल्यानंतर अनेक नवीन अनुप्रयोग आणि सेवा देखील अस्तित्वात येतील. या तंत्रज्ञानामुळे लोकांची जीवनशैली आणि काम करण्याची पद्धतही बदलणार आहे. तत्पूर्वी, Samsung Electronics ने मागील महिन्यात आपली 6G नेटवर्क संबंधित योजना जाहीर केली होती. कंपनीने 6G Spectrum: Expanding the Frontier या टायटलसह एक पेपर शेअर केला होता. ज्यात त्यांनी 5G च्या तुलनेत 6G 50 पट म्हणजेच 1 Tb पर्यंत इंटरनेट स्पीड देईल असा दावा केला होता. 


कोणते नवीन तंत्रज्ञान येणार? 


5G च्या आगमनाने मेटाव्हर्सचे युग सुरू झाले आहे. IoT (Internet of Things) तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे. घराच्या बल्ब ते दारापर्यंत सर्व काही इंटरनेटशी जोडले गेले आहे. 6G आल्यानंतर अशा उपकरणांची संख्या वाढेल. एक अहवालानुसार, 6G नेटवर्कच्या आगमनाने 5G पेक्षा 10 पट अधिक अशी उपकरणे प्रति चौरस किलोमीटरवर दिसतील. म्हणजेच येत्या काही दिवसांत आता आणखी IoT उपकरणे पाहायला मिळतील.


संबंधित बातमी: 


6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा 50 पट जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे