Mark Zuckerberg on Social Media : सध्या सोशल मीडिया (Social Media) हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. सर्व जग सध्या सोशल मीडियाद्वारे एकमेकांना जोडलं गेलं आहे. फेसबुक (Facebook), व्हाट्सॲप (Whatsapp) आणि इंस्टाग्रामची (Instagram) मूळ मालक मेटा (Meta) कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी सोशल मीडिया संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग ज्यांनी सोशल मीडियाची संकल्पना जगासमोर मांडली, त्यांनी सोशल मीडिया वाईट असल्याचं म्हटलं आहे. झुकरबर्ग वैयक्तिकरित्या सोशल मीडियाचे फार मोठे चाहते नाहीत. झुकरबर्ग फार सोशल मीडियाचा फार कमी वापर करतात. झुकरबर्ग यांनी सोशल मीडियाच्या वापराबद्दल म्हटलं आहे की, जर तुम्ही एका जागी बसून फक्त टाईमपास करणार असाल, तर सोशल मीडिया वाईट आहे.


'... तर सोशल मीडियाचा वापर वाईट'


जो रोगनसोबतच्या पॉडकास्ट दरम्यान, मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं की, 'माझ्याकडे दिवसभरात इतक्या गोष्टी करण्यासारख्या असतात. मात्र मला त्यासाठी वेळ पुरत नाही. माझ्यासाठी एका दिवसातील 24 तासही कमी पडतात. मला वैयक्तिकरित्या सोशल मीडियाचा अधिक वापर करायला आवडत नाही. सोशल मीडियाचा वापर तुम्ही योग्यप्रकारे केला तर चांगल अन्यथा सोशल मीडियाचा वाईट आहे. तुम्ही जर दिवसभरात सोशल मीडियावर फक्त एक जागी बसून स्क्रोल करत टाईमपास करण्यासाठी वापर असाल, तर सोशल मीडिया वाईट आहे.'


'वेगवेगळ्या गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा वापर' 


मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं की त्यांची मुलंही सोशल मीडिया वापरतात. त्यांनी सांगितलं की, 'माझी पाच आणि सहा वर्षाची मुलंही सोशल मीडिया वापरतात. त्यांच्या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल अद्याप फारसा विचार करावा लागला नाही, कारण ते अजून लहान आहेत. माझ्या मुलांनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरावं अशी माझी इच्छा आहे, मी त्यांना कोड कसे बनवायचे ते शिकवतो, हे चांगलं एक आउटलेट आहे. त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे.'


'इंस्टाग्राम एक सकारात्मक प्लॅटफॉर्म'


मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं की, 'सोशल मीडियाचा वापर तुम्ही एकमेकांसोबत संवाद वाढवण्यासाठी आणि संबंध निर्माण करण्यासाठी केलात तर तो चांगला आहे पण तुम्ही फक्त टाईमपास करत असाल तर  सोशल मीडिया वाईट चांगला नाही. त्यांनी पुढे सांगितलं की, 'मला असं वाटतं की जास्त अस्वस्थ न होता ट्विटरवर बराच वेळ घालवणं कठीण आहे. याउलट इंस्टाग्राम अतिशय सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्रामवर केलेले बदलांमुळे आणि आगामी काळात होणाऱ्या बदलांमुळे इंस्टाग्राम सकारात्मक बनलं असून तिथे वेळ घालवणे सोपं आहे.'