मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे नेटिझन्सचे जीव की प्राण असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बुधवार संध्याकाळपासून काही काळासाठी डाऊन झाले होते. या तिन्हीअॅपवर फोटो-व्हिडिओ यासारख्या मीडिया डाऊनलोड करण्यात यूझर्सना अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. याचं कारण समोर आले असून हो फेसबुकच्या धोरणाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.
इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेसेंजरवर येणाऱ्या या अडचणींना फेसबुकचे एक धोरण जबाबदार असल्याचे मानले जात आहे. माहितीनुसार इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या बेसिक सॉफ्टवेअरला री-राईट करण्याचा मार्क जुकेरबर्ग यांचा विचार आहे. या तिन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मला उत्तम पद्धतीने एकत्रित जोडण्याचा जुकेरबर्ग यांचा विचार आहे. या संदर्भात अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स ने जानेवारी महिन्यात एक वृत्त देखील प्रकाशित केले होते.
यापूर्वीही फेसबुक खूप वेळाकरता डाऊन झाले होते. मार्च महिन्यात जवळपास 24 तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप व्यवस्थित चालत नव्हते.
सध्या फेसबुकचे 2.3अब्ज यु जर्स आहेत तर इंस्टाग्रामचे एक अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या समाजमाध्यमांशिवाय नेटिझन्सची पानही हलत नाहीत. काल मेसेज पाठवणे किंवा स्टेटस ठेवण्यात कोणतीही अडचण नसली, तरी फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सच्या डाऊनलोडिंगमध्ये प्रॉब्लेम होत होता.
सुरुवातीला हा इंटरनेट प्रॉब्लेम असल्याचं काही जणांना वाटलं, त्यामुळे अनेकांनी आपले फोन रिस्टार्ट करुन पाहिले. मात्र हा त्रास इतरांनाही होत असल्याचं लक्षात आल्यावर तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचं स्पष्ट झालं होतं.
तीन महत्त्वाचे मेसेज आणि फोटो शेअरिंग अॅप स्लो डाऊन झाल्याचे पडसाद ट्विटरही उमटले होते. ट्विटरवर #whatsappdown #instagramdown #facebookdown हे तीन हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये दिसत होते. या तिन्ही अॅपची मालकी फेसबुककडे आहे. मात्र याबाबत त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन असण्याचे 'हे' आहे कारण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2019 02:53 PM (IST)
सुरुवातीला हा इंटरनेट प्रॉब्लेम असल्याचं काही जणांना वाटलं, त्यामुळे अनेकांनी आपले फोन रिस्टार्ट करुन पाहिले. मात्र हा त्रास इतरांनाही होत असल्याचं लक्षात आल्यावर तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचं स्पष्ट झालं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -