HTC Desire 22 Pro Launched: HTC ने बऱ्याच दिवसानंतर आपला नवीन फोन HTC Desire 22 Pro लॉन्च केला आहे. HTC Desire 22 Pro हा जगातील पहिला मेटाव्हर्स स्मार्टफोन असल्याचा दावा केला जात आहे. HTC Desire 22 Pro सह 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला जात आहे आणि याच रिफ्रेश रेट 120Hz आहे. HTC Desire 22 Pro मध्ये Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय HTC Desire 22 Pro मध्ये 4520mAh बॅटरी देण्यात आली आहे. HTC Desire 22 Pro बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
HTC Desire 22 Pro ची फीचर्स
- या HTC फोनमध्ये क्रिप्टो आणि NFT देखील उपलब्ध आहेत.
- HTC Desire 22 Pro मध्ये Viverse अॅप प्रदान करण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते स्वतःची व्हर्चुअल स्पेस तयार करू शकतात आणि व्हर्च्युअल मार्केटप्लेसमध्ये NFT देखील खरेदी करू शकतात.
- HTC Desire 22 Pro मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे, ज्याचे अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेन्स 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे आणि तिसरी लेन्स 5 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.
- सेल्फीसाठी, HTC Desire 22 Pro मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
- HTC Desire 22 Pro मध्ये 8 GB RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे.
- हा HTC फोन Android 12 वर आधारित आहे.
- HTC Desire 22 Pro 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग स्पोर्टसह 4520mAh बॅटरी पॅक करते. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचाही सपोर्ट आहे.
- HTC Desire 22 Pro मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
- HTC Desire 22 Pro ला वॉटर रेसिस्टंटसाठी IP67 रेटिंग मिळाली आहे.
HTC Desire 22 Pro किंमत आणि उपलब्धता
HTC Desire 22 Pro ची किंमत 404 डॉलर्स म्हणजेच जवळपास 31,874 रुपये आहे. एचटीसीचा हा फोन गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत याच्या उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.