Phone Tips: चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनमधील डेटा परत तर मिळत नाही. आपले वैयक्तिक फोटो आणि कॉन्टॅक्ट्स फोनमध्ये असतात. ही वैयक्तिक माहिती जर तुम्हाला फोन हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर डिलीट करायची असेल तर या सोप्या ट्रिकचा वापर करा. जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेल किंवा हरवला असेल तर तुम्ही त्या मोबाईलमधील डेटा ऑनलाइन पद्धतीने डिलीट करू शकता. फोन जरी तुमच्या पासून दूर असेल तरी देखील तुम्ही डेटा डिलीट करू शकता.
असा करा डेटा डिलीट
डेटा डिलीट करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही कंप्यूटर किंवा फोनवर इंटरनेट ब्राउजर ओपन करा.
इंटरनेट ब्राउजवर https://www.google.com/android/find टाइप करा
त्यानंतर तुम्हाला फोनमधील जीमेल आयडी लॉग इन करावा लागेल, जो त्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या स्मार्टफोनमध्ये देखील आहे.
तुमच्या समोर प्ले साउंड, सिक्योर डिव्हाइस आणि इरेज डिव्हाइस असे तिन ऑप्शन दिसतील.
यामध्ये फोनमधील डेटा डिलीट करण्याचा ERASE DEVICE हा ऑप्शन दिसेल.
ERASE DEVICE सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जीमेल पासवर्ड टाकावा लागेल.
जर त्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनचे इंटरनेट ऑन असेल तर सर्व डेटा डिलीट होईल.
OnePlus 9RT Smartphone 2021 : दमदार फिचर्ससह वन प्लसचा क्लासी स्मार्टफोन; काय असेल किंमत?
असे लॉक करा फोटो
Locked Folder चा वापर करत असताना यूजरला सर्वांत पहिले गूगल फोटोजच्या लायब्ररीमध्ये जावे लागेल.
लायब्ररीमध्ये गेल्यानंतर Utilities ऑप्शनवर टॅप करा.
तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला Locked Folder चे ऑप्शन दिसेल.
त्यानंतचर तुम्ही या फोल्डरमध्ये तुमचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकता.
यामध्ये तुम्ही पासवर्ड देखील लावू शकता. त्यामुळे या फोटो आणि व्हिडीओला कोणही पाहू शकणार नाही.
Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत
Google Photos : डिलीट झालेले फोटो परत मिळवायचेत? ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक
Amazon Great Indian Festival Sale: फक्त 10 हजारात मिळवा उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन