Unique Idea in Shark Tank India : स्टार्टअप वर आधारित रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाला (Shark Tank India) भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचं दिसत आहे. या शोमध्ये आलेल्या अनेक तरूण उद्योजकांनी आपल्या भन्नाट कल्पनांनी जजेस आणि लोकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमात आलेल्या 13 वर्षांच्या मुलीचे, अनुष्का जॉलीचे सर्वात जास्त कौतुक होत आहे. या मुलीच्या बिझनेस आयडियाने शार्क्सचे मन तर जिंकलेच, पण सोबत 50 लाख रुपयेचा फंडदेखील जमवला आहे.
तीन वर्षांपासून काम करत आहे
गुरुग्राममध्ये राहणारी 13 वर्षांची अनुष्का जॉलीने (Anoushka Jolly) शार्क टँक इंडियामध्ये एका वेगळ्या कल्पनेसह सहभाग घेतला. तीन वर्षांपूर्वी तिने एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलं होतं. अँटी बुलिंग स्क्वाड (Anti Bullying Squad -ABS) असं त्याचं नाव असून शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि तज्ञांच्या मदतीने 100 हून अधिक शाळा आणि अनेक विद्यापीठातील हजारो विद्यार्थी एकत्र गोळा करुन हे तयार करण्यात आलं आहे. या संकल्पनेसाठी त्यांनी 'कवच' (KAVACH) अॅप तयार केले आहे. हि कल्पना शार्कना खूप आवडली आणि त्यांनी यासाठी 50 लाख रुपये फंडिंग दिले. हे अॅप, बुलिंग म्हणजे भीती घालणे किंवा ब्लॅकमेल करणे या विरोधातील लढाईसाठी मुलांना मदत करते. या गोष्टींना कोणाला सामोरं जावं लागत असेल तर तो या अॅप वर आपले नाव गुप्त ठेऊन तक्रार करु शकतो.
कशी सूचली कल्पना
याबद्दल अनुष्का जॉली म्हणते की, 5 वर्षांपूर्वी तिच्या शाळेत एक कार्यक्रम होता. त्यावेळी तिच्या काही वर्गमित्रांची काही विद्यार्थ्यांनी चेष्ठा-मस्करी केली होती. या घटनेचा तिच्या मित्रांवर मोठा नकारात्मक परिणाम झाला होता. त्यानंतर अनुष्काने हे अॅप तयार केले. या अॅपवर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशिवाय आणि ओळखीशिवाय तक्रार दाखल करता येते.
महत्त्वाच्या बातम्या: