Twitter New Feature : मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन फीचर्स आणत असते. आताही ट्विटर आपल्या स्वयंचलित अकाउंटसाठी (याला bots म्हणून ही ओळखले जाते) एक नवीन फीचर घेऊन आले आहे. या फीचरमुळे तुम्हाला कोणते अकाउंट स्वयंचलित आहे आणि कोणते अकाउंट मानवचलित आहे, यामधील फरक समजून घेण्यास मदत होणार आहे.


ट्वीटरवर आजपासून हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले असून सर्व स्वयंचलित अकाउंटला त्यांच्या प्रोफाइलमध्ये नवीन लेबल जोडण्याचा पर्याय असेल. या फीचरच्या सहाय्याने तुम्हाला कोणत्या इतर वापरकर्त्यांच्या प्रोफाईलची अतिरिक्त माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच कोणते अकाउंट फॉलो करायचे कोणते नाही. हे देखील ठरवण्यास तुम्हाला यामुळे मदत होणार आहे.


या अपडेट फीचरसह ट्विटर लवकरच आणखीन एक नवीन फीचर घेऊन येत आहे. जे लॉन्च झाल्यावर ट्विटरमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरवर लवकरच 140 शब्दांची मर्यादा ओलांडणार आहे. ट्विटर या नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर लॉन्च झाल्यावर 280 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे ट्विट करणे शक्य होणार आहे. 


शर्यतीत टिकण्यासाठी बदल


ट्विटरच्या प्रतिस्पर्धी कंपन्या फेसबुक (Facebook) आणि रेडिट (Reddit) प्लॅटफॉर्मवरती वापरकर्त्यांना कोणत्याही पोस्टसाठी शब्द मर्यादा नाही. यामुळे ट्विटरवर असे फीचर्स देण्यासाठी दबाव होता. याशिवाय आतापर्यंत ट्विटर युजर्सना लांब पोस्टची इमेज किंवा स्क्रीनशॉट बनवून ते अटॅच करून पोस्ट करावे लागत होते. त्यामुळे वापरकर्ते शब्दमर्यादा हटवण्याची मागणी करत होते. दरम्यान, कंपनी हे नवीन फीचर कधी लॉन्च करणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.  


संबंधित बातम्या :