OnePlus Nord CE 2 Amazon : Android यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. Android ने OnePlus Nord CE 2 हा नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन 22 फेब्रुवारीपासून Amazon वर खरेदी केला जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे हा स्मार्टफोन एक्सक्लूसली अॅमेझॉनवर उपलब्ध असेल. यावर तुम्हाला1500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅकदेखील मिळेल. या स्मार्टफोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये जलद चार्जिंग बॅटरी, वेगवान प्रोसेसर आणि सर्वोत्तम कॅमेरा आहे.




OnePlus Nord CE 2 चे फीचर्स :


OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचा कॅमेरा खूपच चांगला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1080p व्हिडिओसह 16MP सेल्फी कॅमेरासह 64MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन ग्रे आणि ब्लू या दोन कलरमध्ये लॉंच करण्यात आला आहे.
फुल-एचडी + एमोलेड डिस्प्लेसह स्मार्टफोनच्या स्क्रीनचा आकार 6.43 इंच आहे. हा स्मार्टफोन 4500mAH लिथियम-आयन बॅटरीसह 65W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो ज्यामुळे फोन फक्त 15 मिनिटांत पूर्ण दिवस चार्ज होईल.
फोनमध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅम असे दोन पर्याय आहेत. फोनमध्ये 128GB स्टोरेज वाढवता येऊ शकते. या मोबाईलमध्ये ड्युअल सिम आहे. त्यापैकी एक 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.


जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत :


हा स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा फोन 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वर एक्सक्लूसिव्हली उपलब्ध होईल. याबरोबरच ICICI बँक कार्ड पेमेंट केल्यावर या फोनवर 1500 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देखील मिळेल.


टीप: ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. या संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha