Samsung Galaxy A Series : सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज स्मार्टफोन्समध्ये बहुतेक क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, परंतु आता असे म्हटले जात आहे की, कंपनी हा फॉरमॅट बदलू शकते. एका मीडिया रिपोर्टद्वारे असे समजले की, सॅमसंग आपल्या नवीन गॅलेक्सी ए सीरीज स्मार्टफोनमध्ये क्वाड ऐवजी ट्रिपल कॅमेरा सेटअप देईल. तसेच सॅमसंग पुढच्या वर्षी 2023 च्या Galaxy A सीरीजच्या 3 स्मार्टफोन्स लॉंच करणार आहे
Galaxy A सीरीज स्मार्टफोनचे युनिट्स
Galaxy A23, Galaxy A34 आणि Galaxy A54 स्मार्टफोन्स 2023 मालिकेत लॉन्च करण्यात येणार आहेत. कंपनी हे तीन स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह देऊ शकते. या स्मार्टफोन्सच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये फक्त वाइड अँगल, अल्ट्रा वाइड अँगल आणि मॅक्रो सेन्सर समाविष्ट केले जाणार आहेत. रिपोर्टनुसार, कंपनी तीनही स्मार्टफोन्स Galaxy A23, Galaxy A34 आणि Galaxy A54 मध्ये 50 MP मेन बॅक कॅमेरा, 8 MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 5 MP मॅक्रो कॅमेरा ऑफर करण्याच्या मूडमध्ये आहे. सॅमसंग पुढील वर्षासाठी या नवीन Galaxy A मालिकेतील स्मार्टफोनचे 60 दशलक्षाहून अधिक युनिट्स तयार करत आहे.
नवी Series कधी येणार?
पुढील वर्षी ही नवीन सीरीज कधी लॉन्च होईल हे सॅमसंगने सांगितले नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy A34 मार्चमध्ये आणि Galaxy A54 एप्रिलमध्ये सादर केला जाऊ शकतो. ट्रेंडफोर्स या मार्केट रिसर्च फर्मने म्हटले आहे की, वापरकर्ते क्वचितच डेप्थ सेन्सर कॅमेरे वापरतात. या कारणास्तव, सॅमसंग सारखी कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोन्समधून डेप्थ कॅमेरे काढून टाकण्याचा विचार करत आहे. या निर्णयामुळे कंपनीला फोनची किंमतही कमी होण्यास मदत होणार आहे. जर हा रिपोर्ट खरा ठरला तर सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन स्मार्टफोन सध्याच्या स्मार्टफोन्सपेक्षा स्वस्त असू शकतात.
महत्वाच्या बातम्या :