Vivo Y30 5G Launch Date: चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने अलीकडेच Vivo Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत बजेट फ्रेंडली आहे. खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. या कमी किमतीच्या 5G स्मार्टफोनच्या डिझाईन आणि रंगासोबतच याचे फीचर्स देखील याला खूप खास बनवतात. हा फोन थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आपण Vivo Y30 5G च्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.


Vivo Y30 5G चे स्पेसिफिकेशन 



  • Vivo Y30 5G मध्ये तुम्हाला 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळेल.

  • Vivo Y30 5G मध्ये HD + 720 x 1600 pixels रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशो सपोर्ट मिळेल.

  • Vivo Y30 5G मध्ये सिक्युरिटीमध्ये फेस अनलॉक फीचर देखील दिले जात आहे.

  • Vivo Y30 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीसह 10W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

  • Vivo Y30 5G डायमेंशन 700 चिपसेट प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे.

  • Vivo Y30 5G मध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 2GB वाढवता येणारी रॅम दिली जात आहे.

  • Vivo Y30 5G चा फ्रंट कॅमेरा 8MP आहे. याशिवाय यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आणि LED फ्लॅशचा समावेश आहे.

  • कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo Y30 5G मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ सेवांचे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.


किंमत 


Vivo चा Vivo Y30 5G स्मार्टफोन हा 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये तुम्हाला 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल. Vivo Y30 5G बजेट स्मार्टफोनची किंमत 237 डॉलर्स इतकी (भारतीय चलनात अंदाजित 18,923 रुपये) आहे. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर Vivo Y30 5G स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅन्टसी या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल.