Whatsapp Avatar Feature : व्हॉट्सअ‍ॅप  (Whatsapp) सध्या प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक अनेक काम व्हॉट्सअ‍ॅप झटपट होतात. आता मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन भन्नाट फिचर (Whatsapp New Feature) आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता तुम्हांला 'अवतार' (Avatar) बनवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडून या नव्या फिचर तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे प्रियजण आणि मित्रमंडळींना तुमच्या अंदाजातील विशेष अवतार स्टिकर (Whatsapp Avatar Feature) बनवता आणि पाठवता येणार आहेत. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने अद्याप या फिचरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच येणार अवतार फिचर


एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फिचरवर काम करत आहे. या फिचरच्या मदतीनं युजर्सना त्यांचं वर्च्युअल रिप्रेझएंटेशन म्हणजे अवतार स्टिकर बनवून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट किंवा कॉल करताना त्याचा वापर करता येणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीकडून व्हिडीओ कॉलवेळी युजर्सच्या चेहऱ्यावर झाकण्यासाठी मास्क फिचर तयार करण्यासाठी ही प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जातं आहे. WABetaInfoच्या रिपोर्टनुसार कंपनीने या नवीन फिचर्सवर काम करत आहे. 


स्वत:चा कस्टमाईज अवतार बनवता येणार


WABetaInfoच्या रिपोर्टनुसार कंपनी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर हे नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचर्सबाबत अपडेटचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं अवतार फिचर Google Play बीटा प्रोग्रामद्वारे तयार केलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकवरील अवतार एकत्र जमवेल. याचा वापर करुन युजर्स स्वत:चा कस्टमाईज अवतारदेखील बनवू शकतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या