सियोल : सॅमसंग लवकरच आपला पहिला 5G स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. दक्षिण कोरियामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सॅमसंग हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कोणत्याही प्री बुकिंगशिवाय गॅलेक्सी एस10 5G हा स्मार्टफोन पाच एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
मात्र सॅमसंगने या फोनची किंमत जाहीर केलेली नाही. पण कोरियन बाजारात या फोनची किंमत 15 लाख वॉन (1332 डॉलर) असू शकते. भारतीय बाजारात या फोनची किंमत अंदाजे 91 हजार 400 रुपये असू शकते. पण
गॅलेक्सी एस-10 5G मॉडेल पडताळणी चाचणीत पास झालं आहे आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात आणण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पण भारतीय बाजारात हा फोन कधी दाखल होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
फोनची वैशिष्ट्ये
6.7 इंच डिस्प्ले
3D डेप्थ कॅमेरा
ट्रिपल कॅमेरा सिस्टम
4500 mAh बॅटरी
अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर
वायरलेस पॉवरशेअर