मुंबई : जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मेसेंजर अॅप असलेले व्हाॅटसअॅप वेळोवेळी आपल्या युझर्ससाठी नव्या नव्या गोष्टींचा अविष्कार करत असते. सध्या व्हाॅटसअॅपचे एकूण १.३ बिलियन युझर्स आहेत. सध्या व्हाटसअॅपला फेक न्यूजला सामोरे जावे लागत आहे. यासाठी व्हाटसअॅपने मेसेज फॉरवर्डची मर्यादा कमी केली आहे.
यासोबतच अनेक नवीन फीचर्स व्हाॅटसअॅप आपल्या युझर्ससाठी आणणार आहे. यामध्ये 5 मुख्य फीचर्स असे आहेत जे लवकरच आपल्या मोबाईलमध्ये दिसून येणार आहेत. .
काय आहेत नवीन फीचर्स
रिव्हर्स इमेज सर्च
व्हाॅटसअॅप बीटा 2.19.73 अपडेटमध्ये रिव्हर्स इमेज सर्च या फीचरचा समावेश होणार आहे. यामुळे युझरला आपल्या चॅटबॉक्समध्ये आलेल्या फोटोची पडताळणी करणे सोपे होणार आहे. चॅटबॉक्समध्ये आलेल्या फोटोला या माध्यमातून युझरला सरळ गुगलमध्ये सर्च करून सदर फोटो खरा की खोटा याबद्दल माहिती मिळू शकणार आहे. हे फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे.
डार्क मोड
अनेकदा युझरला व्हाॅटसअॅपच्या तीव्र प्रकाशामुळे त्रासाचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी या गोष्टीचा जास्त सामना करावा लागतो. यासाठी व्हाॅटसअॅप आता डार्क मोड आणणार आहे. यामुळे युझर आरामात तीव्र प्रकाशाच्या त्रासाशिवाय रात्रीच्या वेळी देखील व्हाॅटसअॅप वापरू शकेल. यामुळे बॅटरीची देखील बचत होणार आहे.
3 डी टच अॅक्शन
हे फीचर आयफोन युझर्ससाठी एक्सक्लुझिव्ह फीचर आहे. या फीचरमुळे युझर दुसऱ्या युझरचे स्टेटस त्याला माहिती न होऊ देता वाचू शकणार आहेत. हे फीचर सध्या बीटा युझर्ससाठी उपलब्ध आहे जे लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
प्रायव्हेट रिप्लाय
या फीचरचा उपयोग काही दिवसांपासून केला जात आहे. हे फीचर लवकरच iOS मध्येही दिले जाणार आहे. या फीचरमुळे युझर कोणत्याही ग्रुपचॅटमध्ये अन्य युझरला प्रायव्हेटमध्ये रिप्लाय करू शकणार आहे.
ऑडीओ पिकर
या फीचरच्या मदतीने आपण अन्य युझरला ऑडीओ फाईल पाठवताना स्वतः ऐकू शकणार आहोत. सोबतच आपल्या फोनमधील म्युझिक फाईलची लिस्ट तयार होणार आहे. या ऑडीओ लिस्टद्वारे युझर ३० फाईल एकत्रित पाठवू शकणार आहे.
फोटो खरा की खोटा? पडताळणी होणार, व्हाॅटसअॅपच्या जगात 5 नवे भन्नाट फीचर्स येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2019 09:54 AM (IST)
यासोबतच अनेक नवीन फीचर्स व्हाॅटसअॅप आपल्या युझर्ससाठी आणणार आहे. यामध्ये 5 मुख्य फीचर्स असे आहेत जे लवकरच आपल्या मोबाईलमध्ये दिसून येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -