Samsung Galaxy Unpacked 2021 : साऊथ कोरियन कंपनी सॅमसंगचा आज यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट आज संध्याकाळी सात वाजता सुरु होईल. या इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग (Samsung Live Streaming) सॅमसंगच्या ऑफिशिअल वेबसाइटवर करण्यात येणार आहे. या वर्च्युअल इव्हेंटमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 3 सोबतच Galaxy स्मार्टवॉच आणि ईयरबर्ड्स लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची बऱ्याच काळापासून वाट पाहण्यात येत होती. आता ही प्रतिक्षा संपणार आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत... 


Samsung Galaxy Z Fold 3 चे स्पेसिफिकेशन्स 


Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनची मेन स्क्रिन 7.55 एवढी असणार आहे. तर याची सेकेंडरी स्क्रिन 6.23 इंचाची असणार आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर कव्हर स्क्रिन 1.9 इंचाचा असणार आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात येणार आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेराही देण्यात येणार आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सल असणार आहे. पॉवरसाठी 4,400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. याच्या 256GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत EUR 1,678.51 म्हणजेच, 1,47,400 रुपये असू शकते. फोन Phantom Green, Phantom Silver आणि Phantom Black कलरच्या ऑप्शनसह लॉमन्च करण्यात येणार आहे. 


Samsung Galaxy Z Flip 3 चे स्पेसिफिकेशन्स 


Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर दिला गेला आहे. यामध्ये  8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात येईल. पॉवरसाठी फोनमध्ये 3,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 


Galaxy Watch 4 Series


Galaxy Watch 4 सीरीज WearOS 3 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह लॉन्च करण्यात येणार आहे. या सीरिजअंतर्गत Galaxy Watch 4 आणि Galaxy Watch 4 Classic मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. Galaxy Watch 4 स्मार्टवॉच 40mm, 44mm मध्ये उपलब्ध असतील. तर Galaxy Watch 4 Classic स्मार्टवॉच 42mm आणि 46mm मध्ये उपलब्ध असेल. या वॉचमध्ये 1.3 इंचचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. यामध्ये युजर्स हार्ट रेट मॉनिटर, ECG आणि GPS सपोर्ट मिळेल. 


Galaxy Buds 2


या इव्हेंटमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच व्यतिरिक्त Galaxy Buds 2 देखील लॉन्च केलं जाऊ शकतं. यामध्ये अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सिलेशन फिचर दिलं जाऊ शकतं. हे ईयरबर्ड्स yellow, purple, white, dark green आणि black कलर ऑप्शंससह लॉन्च केले जाऊ शकतात.