Motorola Edge 20 : मोटोरोला इंडियानं आपले दोन नवे स्मार्टफोन Motorola Edge 20, Edge 20 Fusion भारतात लॉन्च केले आहेत. Motorola Edge 20, Edge 20 Fusion दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबत 20:9 आस्पेक्ट रेशियो असणारा OLED डिस्प्ले दिला आहे. मोटोरोलाच्या या दोन्ही स्मार्टफोन्सला वॉटर आणि डस्टप्रूफसाठी IP52ची रेटिंग मिळाली आहे.  Motorola Edge 20 ची स्पर्धा भारतीय बाजारात OnePlus Nord 2, Vivo V21 आणि Samsung Galaxy A52 यांसारख्या स्मार्टफोनसोबत होईल. 


Motorola Edge 20, Edge 20 Fusion ची किंमत 


Motorola Edge 20 च्या 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे. हा फोन युजर्सना फ्रोस्टेड पर्ल आणि फ्रोस्टेड एमरल्ड कलरमध्ये 24 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट किंवा इतर रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे. तसेच Motorola Edge 20 Fusion च्या 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 21,499 रुपये आणि 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन सायबर स्टील आणि इलेक्ट्रिक ग्रेफाइट कलरमध्ये 27 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल स्टोर्समधून खरेदी करता येणार आहे. 




Motorola Edge 20 चे स्पेसिफिकेशंस


Motorola Edge 20 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. फोन अॅन्ड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 


कॅमेरा 


या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी लेंस 108 मेगापिक्सलची देण्यात आली आहे. तसेच दुसरी लेंस 8 मेगापिक्सलची आहे. तर तिसरी लेंस 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 


Motorola Edge 20 ची बॅटरी


कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.2, GPS/A-GPS, NFC आणि यूएसही टाईप-सी पोर्ट देण्याता आला आहे. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यासोबत 30W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलं आहे. फोनचं वजन 163 ग्रॅम आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :