Samsung Galaxy F22 Sale : स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने काही दिवसांपूर्वी आपले लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केले होते. अशातच सॅमसंगचा बहुचर्चित आणि मिड रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy F22 युजर्सना खरेदी करता येणार आहे. या फोनचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. युजर्स फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहेत. फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या कॅमेर्यासोबतच 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स...
या आहेत ऑफर्स...
Samsung Galaxy F22 चा 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 12,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 14,499 रुपये आहे. जर तुम्ही हा फोन एक्सेस बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी करणार असाल तर त्यावर तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळेल. त्यासोबतच फोनवर 13,700 रुपयांपर्यंतचा एक्सेंज ऑफरही देण्यात येत आहे. फोन डेनिम ब्लू आणि डेनिम ब्लॅक कलर ऑप्शन्ससोबत लॉन्च करण्यात येणार आहे.
Samsung Galaxy F22 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्जचा असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. तसेच, हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीबद्दल बोलायचं तर सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल. सेकंडरी कॅमेरा 8-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेन्सरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो.
बॅटरी
पॉवरसाठी फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :