Samsung Galaxy A73 5G : सॅमसंग यूजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने भारतात आपल्या नवीन Samsung Galaxy A73 5G ची किंमत तसेच विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल हे सांगितले आहे. यापूर्वी कंपनीने Galaxy A53 आणि A33 भारतात लॉन्च केले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पहिला प्रकार 8 GB RAM सह 128 GB इंटर्नल मेमरी आणि दुसरा 8 GB RAM सह 26 GB इंटर्नल मेमरी असा असणार आहे.
हा स्मार्टफोन Osm Mint Osm ग्रे आणि Osm व्हाईट कलरमध्ये खरेदी करता येईल. यासाठी कंपनी 8 एप्रिल रोजी खुल्या विक्रीचे आयोजन करणार आहे. जे ग्राहक हा स्मार्टफोन प्री-बुक करतील ते सॅमसंग गॅलेक्सी बड्स लाइव्ह 499 रुपयांना खरेदी करू शकतील.
या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 120 Hz च्या रीफ्रेश दरासह 6.7-इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्याची रचना सॅमसंगच्या प्रीमियम फोनपासून प्रेरित आहे. फोनला IP67 सर्टिफिकेट देखील मिळाले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आला आहे.
स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल्सचा आहे. 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, फोन 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन Google च्या Android 12 Base OneUI 4.1 वर काम करेल. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी 44,999 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Whats App : भारतातील 14 लाखांहून अधिक युजर्सचे Whats App अकाउंट बंद
- वनप्लसचा भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फोनबाबतच्या 11 गोष्टी!
- Infinix 5G Phone : इन्फिनिक्स कंपनीचा पहिला 5जी स्मार्टफोन सादर, पाहा कसा आहे 'झीरो 5जी'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha