Reliance Jio : रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. याआधी Reliance Jio ने ही प्रीपेड टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले होते. त्याआधी एयरटेल (Airtel) आणि  व्हीआय (VI) ने प्लॅनच्या दरात वाढ केली होती. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत जिओनंही प्रीपेड प्लॅनची किंमत वाढवली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत होती. पण आता रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे.  


देशातील कुठल्याही नेटवर्क कंपनीने एवढा स्वस्तातला प्लॅन अजून काढलेला नाही. जिओचा हा नवीन प्लॅन अवघ्या एक रुपयात मिळणार आहे. तसेच ग्राहकांना या रिचार्जवर 30 दिवसांची वॅलिडीटीही मिळणार आहे. जिओचा हा नवीन प्लॅन फक्त माय जिओ ऍप वर उपलब्ध आहे. वेबसाईटवर उपलब्ध नाही.


भारतात सध्यातरी दुसरी टेलिकॉम कंपनी एक रुपयात कुठलाही प्लॅन ऑफर करत नाही. एका रुपयांच्या प्लॅन मध्ये ग्राहकांना 100 एमबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. हा 100 एमबी डेटा संपल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट मिळणार, परंतु स्पीड कमी होऊन ग्राहकांना 64Kbps स्पीड मिळेल.


जिओचा नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ ऍपवर जाऊन Other Plans मध्ये गेल्यावर Value सेक्शनवर दिसेल. जर एक रुपयाचा रिचार्ज ग्राहकाने 10 वेळा केला तर, ग्राहकाला एक जीबी डेटा मिळेल. कंपनीकडे 15 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक जीबी डेटा मिळतो. त्यामुळे 15 रुपयांच्या रिचार्जपेक्षा हा एक रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अधिक स्वस्त पडेल.


संबंधित बातम्या


EV products : जिओ-बीपी आणि महिंद्रा ग्रुप इलेक्ट्रिक वाहनांसह कार्बन सोल्यूशनसाठी एकत्र


Reliance Jio New Tariffs : Reliance Jioचा रिचार्जही महागला, पाहा प्लॅनचे नवे दर...


Jio Recharge : येत्या 1 डिसेंबरपासून तुमचा जिओचा रीचार्ज महागणार; खिशाला किती कात्री लागणार? 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha