मुंबई : भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियानंतर आता मुकेश अंबानींच्या मालकीच्या असणाऱ्या जिओने त्यांच्या टेलिकॉम कंपनीच्या रिचार्जच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिओचा रीचार्ज आता 20 टक्क्यांनी महागणार असून त्याची अंमलबजावणी येत्या 1 डिसेंबरपासून केली जाणार आहे. जिओच्या रीचार्ज महाग करण्याचा परिणाम हा देशातील जवळपास अर्ध्या मोबाईल यूजर्सवर होणार आहे. 

जिओ कंपनीच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "येत्या काळात प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थाने चांगली डिजिटल सुविधा देण्यासाठी जिओने आपल्या रीचार्जच्या प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम इंन्डस्ट्रिजमधील सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी जिओ कटिबद्ध आहे. जगभरात सर्वात स्वस्त दरात आणि चांगल्या गुणवत्तेचे रीचार्ज प्लॅन्स देण्यासाठी जिओ नेहमी प्रयत्नशील आहे. याचा लाभ जिओच्या सर्व ग्राहकांना मिळेल."

जिओचा कोणता प्लॅन किती महाग झाला? 

  • जिओचा 28 दिवसांसाठी असणारा मासिक तीन जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 50 एसएमएस हा प्लॅन 75 रुपयांवरुन 91 रुपयांचा झाला आहे. 
  • जिओचा सर्वात महाग असलेला 365 दिवसांसाठीचा प्रति दिवस 2 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि प्रति दिवस 100 एसएमएस असणारा प्लॅन हा 2399 वरुन 2879 रुपयांचा झाला आहे. 

जिओचे हे नवीन प्लॅन 1 डिसेंबरपासून लागू असणार आहेत. त्या आधी गेल्या आठवड्यात व्होडाफोन-आयडीया आणि भारती एअरटेलने आपल्या रीचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha