Realme C35 Launch : हँडसेट निर्माता कंपनीने Realme आपला नवीन स्मार्टफोन Realme C35 या महिन्याच्या 10 फेब्रुवारीला लॉंच करणार आहे असं सांगतिलं आहे.  लॉन्चच्या तारखेव्यतिरिक्त, कंपनीने मोबाईलच्या डिझाईनची झलक देखील दिली आहे. या स्मार्टफोनच्या भन्नाट फीचर्सविषयी अधिक सविस्तरपणे जाणून घेऊ. 


Realme C35 चे फीचर्स :
टिपस्टर सुधांशू अंभोरे यांनी ट्विट करून या Realme मोबाईलचे फीचर्स लीक केले आहेत. हा मोबाईल Android 11 वर चालणारा आहे. या मोबाईलला 6.6-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. याचा वेग आणि मल्टीटास्किंगसाठी युनिसॉक T616 प्रोसेसर आहे. 4 GB रॅमसह 64 GB/128 GB स्टोरेज या मोबाईलमध्ये असणार आहे. 


या Realme मोबाईलच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या मोबाईलमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिसणार आहे. 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सर देखील आहे. तर सेल्फीसाठी, फोनच्या समोर 8 मेगापिक्सेल Sony IMX355 कॅमेरा सेंसर आहे.


याशिवाय, 5000 mAh बॅटरी 18 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध असणार आहे. हा मोबाईल USB Type-C पोर्टसह लॉंच केला जाईल. रिअ‍ॅलिटीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्टवरून, अशी माहिती देण्यात आली आहे की हा नवीनतम Realme मोबाईल 10 फेब्रुवारी रोजी लॉंच होणार आहे. याचं लाइव्ह स्ट्रीमिंगच्या फेसबुक पेजवर पाहता येईल. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha