Google Chrome logo: सध्या या इंटरनेटच्या युगात मोबाईलपासून लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा इंटरनेट ब्राउजर (Internet Browser) म्हणजे गुगल क्रोम (Google Chrome). दरम्यान याच गुगल क्रोमने त्यांचा लोगो पुन्हा एकदा बदलला असून तब्बल आठ वर्षानंतर त्यांनी हा बदल केला आहे. किंचितसा बदललेला हा लोगो सध्या कॅनेरी व्हर्जनमध्ये दिसत असून लवकरच स्टँडर्ड व्हर्जनमध्ये देखील हा बदल दिसून येईल. सध्यातरी गुगल क्रोमचा एक डिझायनर एल्विन हू याने ट्वीट करत हा नवा लोगो सर्वांसमोर आणला आहे. त्याने यावेळी कंपनी आठ वर्षानंतर लोगोमध्ये बदल करत असल्याचा उल्लेख देखील केला आहे.



गुगल क्रोम 2008 मध्ये लॉन्च झालं. त्यावेळी लोगो 3D दिसून येत होता. त्यानंतर 2011 आणि मग 2014 मध्ये लोगोमध्ये काही बदल करण्यात आले. अशाप्रकारे काही बदलानंतर आता अखेर 2022 च्या सुरुवातीला आणखी एक बदल या लोगोमध्ये करण्यात आला आहे. सध्याचा लोगो 2D आहे.  


कसा आहे नवा लोगो?


नव्या लोगोमध्ये पहिल्याप्रमाणेच रंग असले तरी आताचे रंग काहीसे गडद आहेत. तसचं लोगोचं आकारमानही काहीसं बदललं आहे. त्यामुळे हा नवा लोगो आणखी वेगवानरित्या फिरत असल्याचा आभास होत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना गुगल क्रोम आणखी वेगवान सुविधा देणार हे देखील प्रतित होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha