Fine on Facebook:  मागील काही दिवसांपासून मेटा कंपनीचे ( याआधीची फेसबुक) (Facebook Meta) वाईट दिवस सुरू असल्याचे चित्र आहे. अमेरिकेत एफटीसीने एकाधिकारशाहीच्या मुद्यावर खटला दाखल केल्यानंतर फेसबुकच्या युजर्समध्ये घसरण झाल्याचे समोर आले होते. त्याच्या परिणामी फेसबुकच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आता ब्रिटनमध्ये फेसबुकला मोठा धक्का बसला आहे. फेसबुकला, META कंपनीला 15 कोटी पाउंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय मेटाला (META) आपली एक कंपनीदेखील विकावी लागणार आहे. 


या कारणांमुळे ठोठावला दंड 


मेटा कंपनीने मे 2020 मध्ये 40 कोटी डॉलर खर्च करून अॅनिमेटेड इमेज प्लॅटफॉर्म (Giphy) खरेदी केला होता. मेटाकडून झालेल्या या व्यवहारानंतर कंपनीच्या डिजिटल जाहिरातींवर ((Digital Advertising) होणाऱ्या परिणामांबाबत कल्पना दिली नव्हती. या गोष्टीला गंभीरपणे घेत ब्रिटनच्या कॉम्पिटिशन अॅण्ड मार्केट्स ऑथिरिटीने (CMA) मेटा कंपनीला 15 कोटी पाउंडचा दंड ठोठावला. मेटा कंपनीने गिफी कंपनीचे संचलन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचे सांगितले. प्राधिकरणाने या गिफीची विक्री करण्याचे आदेश दिलेत. तर, मेटाने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. निकालावर नाराज असलो तरी आम्ही दंडाची रक्कम भरणार असल्याचे 'मेटा'ने म्हटले.


याआधीदेखील दंड


CMAने याआधीदेखील फेसबुकला दंड ठोठावला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये फेसबुकला 5.5 कोटी पाउंडचा दंड ठोठावला होता. 


अॅपलमुळे  दहा अब्ज डॉलरचं नुकसान


फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया कंपनीची मूळ कंपनी Meta Platforms Inc ने अॅप्पलमुळे दहा अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं सांगितलं. अॅप्पल कंपनीच्या एका फिचर्समुळे फेसबुकला तब्बल दहा अब्ज डॉलरचं नुकसान झाले. Meta Platforms Inc ने सांगितले की,  अॅप्पलच्या प्रायव्हसी बदलामुळे मोठं नुकसान सहन करावे लागले. iOS च्या प्रायव्हसी बदलावामुळे फेसबूक कंपनीला दहा अब्ज डॉलर रुपयाचं नुकसान झालेय. Meta Platforms Inc चे सीएफओ डेव्ह वेहनर यांच्या मते, iOS च्या बदलामुळे यावर्षी कंपनीच्या व्यावसायावर मोठा परिणाम झाला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha