नवी दिल्ली : रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी विशेषतः महिलांसाठी तयार करण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म 'हरसर्कल'ला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने लॉन्च केलं आहे. महिलांचं सशक्तीकरण आणि वैश्विक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थनासाठी 'हरसर्किल' प्लॅटफॉर्म महिलांना एक सुरक्षित माध्यम ठरेल.


महिलांसाठी जगभरातील डिजिटल गट म्हणून 'हरसर्कल' तयार करण्यात आलं आहे. भारतीय महिलांपासूनच याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, जगभरातील महिलांच्या भागीदारीचा रस्ता यामुळे खुला होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे हे प्रत्येक वयोगटातील आणि आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करेल.


'हरसर्कल'च्या लॉन्चिगवेळी बोलताना रिलायन्सच्या चेअरपर्सन नीता अंबानी बोलताना म्हणाल्या की, "महिलाच महिलांची काळजी घेतात, त्यावेळी अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी 11 मुलींच्या कुटुंबात वाढले. जिथे मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. मी माझी मुलगी ईशाकडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अटीशिवाय प्रेम आणि विश्वास ठेवायला शिकले. मी सहानुभूती आणि धैर्य माझी सून श्लोकाकडून शिकले. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करणाऱ्या महिला असो वा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला नेत्या, आमच्या अनुभवांनी मला शिकवलं आहे की, आपला संघर्ष आणि विजय एकमेकांशी गुंफलेले आहेत."


नीता अंबानी म्हणाल्या की, 'आम्ही HerCircle.in मार्फत लाखो महिलांसाठी एक मोठी संधी ठरु शकते. यामध्ये प्रत्येक महिलेचं स्वागत केलं जाईल. चोवीस तास वैश्विक नेटवर्किंग, डिजिटल क्रांती आणि सर्वांच्या मदतीने हरसर्किल महिलांचे विचार आणि त्यांच्या मतांचं स्वागत करेल. समानता आणि समता ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्य असतील.'



सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममार्फत महिला एकमेकींशी संवाद साधू शकतील. इथे व्हिडीओ पाहू शकतील. याव्यतिरिक्त आर्थिक, काही कामं, व्यक्तित्व विकास, मनोरंजन, सर्जनशीलता, स्वत: चं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामुदायिक सेवा, सौंदर्य, फॅशनशी निगडीत आर्टिकल्सही वाचू शकतील. याव्यतिरिक्त महिलांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभागावर आधारित लेखही वाचायला मिळतील. तसेच या प्लॅटफॉर्मवर रिलायन्सच्या विशेषतज्ज्ञांच्या पॅनल मार्फत महिलांना आरोग्य, कल्याण, शिक्षण, उद्योजकता, आर्थिक, परोपकार आणि नेतृत्त्वावर फ्री सल्लाही देण्यात येईल.


नोकरीच्या संधी


या प्लॅटफॉर्मवर महिलांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होती. त्याचसोबत यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी काही टिप्सही महिलांना शिकायला मिळतील. हरसर्कलचा सोशल नेटवर्किंग भाग केवळ महिलांसाठीच असेल. दरम्यान व्हिडीओ आणि आर्टिकलचं सेक्शन ओपन फॉर ऑल असेल. याव्यतिरिक्त आर्थिक व्यवस्थापन आणि आरोग्याशी निगडीत प्रश्नांसाठी एक विशेष चॅटरूमही तयार करण्यात आली आहे. तसेच फिटनेस, गरोदरपणा आणि पालकत्व संबंधी विषयांसाठी एक विशेष 'हर गुड हॅबिट अॅप ट्रॅकर'ही यामध्ये देण्यात येतील.


दरम्यान, हरसर्कलला डेस्कटॉप आणि मोबाईलवर वापरता येणार आहे. ही एक वेबसाईट आहे. त्याचसोबत गूगल प्ले स्टोअर आणि माय जियो अॅप स्टोअरवर ही वेबसाईट मोफत उपलब्ध होणार आहे. युजर्स यामध्ये फ्री रजिस्ट्रेशन करु शकतात. सध्या ही वेबसाईट इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. दरम्यान, येत्या काळात ही वेबसाईट इतर भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करण्यात येईल.