मुंबई : पबजीचे भारतीय व्हर्जन असणाऱ्या Battlegrounds Mobile India या गेमची आतुरता अनेकांना लागली आहे. त्याचं लॉन्चिंग लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. पण लॉन्चिंगच्या आधीच भारतात डाऊनलोडिंगसाठी हा गेम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या गेमचा बीटा व्हर्जन आता टेस्टिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण मर्यादित संख्येनेच यूजर्संना गुगल प्ले स्टोअरवरुन या गेमचे डाऊनलोड करता येऊ शकेल. बीटा व्हर्जननंतर आता या गेमचे लॉन्चिंग लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे.
मर्यादित यूजर्सना फायदा
बिटा व्हर्जनच्या टेस्टिंगचा फायदा हा काहीच यूजर्सना मिळणार आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरच्या नियमानुसार बीटा व्हर्जनच्या यूजर्सची संख्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता Battlegrounds Mobile India गेमच्या बीटा टेस्टिंगने रिक्वेस्ट बंद केली आहे. याचा अर्थ सर्वसामान्यांना अद्याप या गेमचा आनंद घेता येणार नाही.
गेम खेळण्यासाठी खालील नियम असतील.
- Battlegrounds Mobile India गेमला OTP च्या माध्यमातून लॉग-इन करता येऊ शकेल.
- OTP व्हेरिफिकेशननंतर हा गेम खेळता येऊ शकेल.
- प्लेअर्स व्हेरिफाईड कोडला तीन वेळा वापरु शकतात, त्यानंतर हा कोड इनव्हॅलिड होईल.
- एक व्हेरिफिकेशन कोड केवळ पाच मिनीटांसाठीच असेल, त्यानंतर तो एक्सपायर होईल.
- लॉग-इनसाठी प्लेअर्स फक्त 10 वेळा OTP रिक्वेस्ट टाकू शकतील.
- प्लेअर एका मोबाईल नंबरवरुन जास्तीत जास्त 10 अकाऊंटवर रजिस्टर करु शकेल.
पबजी चं भारतीय व्हर्जन असणारा Battlegrounds Mobile India या गेमची निर्मिती दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी Krafton कडून करण्यात आली आहे. याचे लॉन्चिंग जूनमध्ये होणार असून, यासाठी प्री रजिस्टर करणाऱ्यांना खास रिवॉर्डही मिळणार असल्याचं क्राफ्टनकडून या आधी जाहीर करण्यात आलं होतं.
गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुलांसाठी नियम काही अंशी कठोर ठेवण्यात आले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्यासाठी त्यांना पालकांचा दुरध्वनी क्रमांकही द्यावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :