सॅन फ्रान्सिस्को : भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ( Microsoft Corp) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे विद्यमान चेअरमन जॉन थॉम्पसन यांच्या जागी नाडेला आता चेअरमन होणार आहेत. फेब्रुवारी 2014 मध्ये स्टीव्ह बाल्मर यांच्या जागी सत्य नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. नडेला यांनी अॅपल आणि गुगल अशा प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत मायक्रोसॉफ्टला लोकप्रिय बनवले आहे. यामध्ये नडेला यांचे मोठे योगदान आहे. 


जॉन थॉम्पसन यांची 2014 साली मायक्रोसॉफ्टच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती. कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी चेअरमनपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर थॉम्पसन यांची नियुक्ती करण्यात आली होती. सत्य नाडेला मायक्रोसॉफ्टचे चेअरमन झाल्यानंतर थॉम्पसन हे कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहणार  आहेत. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशापुढं मोठं आव्हान उभे केले होते. अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनापासून आरोग्य विभागापर्यंत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या यंत्रणांवरचा ताणही वाढत होता. अनेक भागांमध्ये आवश्यक सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातील हे चित्र पाहता अनेक मित्र राष्ट्रांनी देशाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. याशिवाय काही धनाढ्य व्यक्तीही आता भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या होता.  त्यामध्ये सत्या नडेला देखील होते.  मायक्रोसॉफ्ट सर्व प्रकारच्या मदतीसाठी हातभार लावणार असल्याचं सांगत क्रिटिकल ऑक्सिजन कंसन्ट्रेशन डिवाइस खरेदी करण्यासाठीही आधार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होते. 


मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी जवळपास 27 वर्षांच्या वैवाहिक नात्यातून वेगळं होत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. जगातील सर्वाधिक मोठ्या समजल्या जाणाऱ्या बिल ॲंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन  या स्वयंसेवी संस्थेसाठी हे दोघंही एकत्र काम करणं सुरुच ठेवणार आहेत.$100 billion इतकं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या बिल गेट्स यांच्या नावाचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता. 1994 मध्ये हवाई येथे बिल आणि मेलिंडा विवाहबंधनात अडकले होते. मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून मेलिंडा कार्यरत असतानाच त्यांची ओळख झाली होती.