Oppo A57 4G Launch in India : Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन OPPO A57 4G भारतात लॉन्च केला आहे. Oppo ने थायलंडमध्ये Oppo A57 4G लाँच केले आहे आणि त्यामुळेच कंपनी भारतातही लॉन्च करेल अशी अपेक्षा होती. Oppo A57 4G हा Oppo चा बजेट स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीने 3 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजसह 2 मॉडेलसह OPPO A57 4G सादर केला आहे. त्याच्या 4/64 मॉडेलची किंमत 13,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन साईटवरसुद्धा उपलब्ध आहे. 


OPPO A57 4G ची वैशिष्ट्ये :



  • Oppo A57 4G मध्ये MediaTek Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. 

  • Oppo A57 4G मध्ये 6.56-इंच स्क्रीनसह HD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1612 x 720 पिक्सेल आहे. फोनमध्ये 60 HZ चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे.

  • Oppo A57 4G स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्स्टेंडेड रॅमची सुविधाही आहे, ज्यामुळे फोनची रॅम 4 जीबीपर्यंत वाढवता येते. यासोबतच 1 टीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरीचा पर्यायही देण्यात आला आहे.

  • Oppo A57 4G स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्स्टेंडेड रॅमची सुविधाही आहे, ज्यामुळे फोनची रॅम 4 जीबीपर्यंत वाढवता येते. यासोबतच 1 टीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरीचा पर्यायही देण्यात आला आहे.

  • Oppo A57 4G ड्युअल कॅमेरा सेटअपसह उपलब्ध आहे. यात 13 MP मुख्य कॅमेरा आणि 2 MP दुसरा कॅमेरा आहे. 

  • फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर फोनचा फ्रंट कॅमेरा 8 MP देण्यात आला आहे.

  • Oppo ने या फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे, जी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की 30 मिनिटांत हा फोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो.

  • Oppo A57 4G पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. 

  • Oppo A57 4G Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर चालतो.

  • यामध्ये AI फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.


महत्वाच्या बातम्या :